पनवेल : मुंब्रा पनवेल महामार्गावर शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागला. नावडे उड्डाण पुलावर दीड किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. रोडपाली जंक्शनवर चारही रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. शीव पनवेल महामार्गावरुन लोखंड बाजार व मुंब्रा पनवेल महामार्गा पर्यंत पोहच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
कळंबोली वसाहतीमधून अविदा हाॅटैलसमोरील रस्त्यावर वाहन कोंडी होती. रोडपाली सिग्नल चौकात वाहतूक पोलीस नियमनासाठी असताना सुद्धा कोंडी कायम होती. २ मिनिटांचे अंतर कापण्यासाठी १० ते पंधरा मिनीटे लागत होती. कळंबोली वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांना वाहन कोंडीबाबत विचारल्यावर त्यांनी चार कर्मचारी येथे नेमल्याची माहिती दिली.
First published on: 23-09-2023 at 12:23 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic congestion on mumbra panvel highway from navade to roadpali amy