Yashashree Shinde Murder Case : उरणमध्ये यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर, आता आरोपी दाऊद शेख याला आज कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.दरम्यान, यावरून यशश्रीच्या आईने अंत्यत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण फॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या. सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल. पण त्याला फाशी दिलीच पाहिजे”, असं यशश्रीच्या (Yashashree Shinde Murder Case) आईने सांगितलं.

हेही वाचा >> Yashshree Shinde Murder : यशश्री शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

“प्रशासनाने या प्रकरणात कडक कायदा तयार केला पाहिजे. निर्भया प्रकरण झाल्यानंतर सरकारला जाग आणि कायदे तयार केले गेले. पण असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कायद्यात कठोर तरतूद केल्या पाहिजे”, अशी मागणी यशश्रीच्या वडिलांनी (Yashashree Shinde Murder Case) केली आहे.

हेही वाचा >> एकतर्फी नाही, लव्ह ट्रँगलमधून यशश्री शिंदेची हत्या? संशयित आरोपी दाऊद शेखला अटक केल्यानंतर पोलिसांनी दिली माहिती!

पोलिसांना सांगितला हत्येचा घटनाक्रम

२५ जुलैला यशश्री शिंदे (Yashashree Shinde Murder Case) बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचा (Yashshree Shinde) मृतदेह आम्हाला सापडला. त्यानंतर शनिवार सकाळी म्हणजेच २७ जुलैला हत्येचा गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणात आम्ही दोन ते तीन संशयित शोधले होते. त्यांच्या शोधासाठी आम्ही नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी शोध पथक पाठवलं. ज्या गोष्टी आम्हाला कळत होत्या त्या कर्नाटकमध्ये आम्ही पथकाला देत होतो. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आली. दाऊदचं नेमकं लोकेशन काय? ते आम्हाला सापडत नव्हतं. आम्हाला हे समजलं होतं की दाऊद शेख कर्नाटकचा आहे. त्यानंतर त्याचे नातेवाईक, त्याचा मित्र या सगळ्यांची माहिती आम्हाला कामाला आली. यातला मोहसिन नावाचा संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. मात्र त्याने हत्या केलेली नाही. दाऊद आणि यशश्री या दोघांचा काहीही संपर्क नव्हता. त्याची चौकशी आम्ही करतो आहोत. कारण त्याने गुन्हा मान्य केला आहे असं पोलिसांनी सांगितलं.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashashree shinde murder case mother reaction after daud shaikh arrested sgk
Show comments