A woman injurd by person when he shoot stray dogs in vasai | Loksatta

भटक्या श्वानाला मारण्याच्या नादात महिलेच्या पायात गोळी घूसली

परिसरात भटक्या श्वानांचा त्रास वाढल्यामुळे आरोपी हैरान झाला होता.

भटक्या श्वानाला मारण्याच्या नादात महिलेच्या पायात गोळी घूसली
संग्रहित छायाचित्र

वसईच्या गिरीज परिसरात एक इसम भटक्या श्वानाला छऱ्याच्या बंदुकीने गोळी मारत असताना, त्याचे लक्ष चुकल्याने रस्त्यावरून जात असणाऱ्या महिलेच्या पायाला गोळी लागून महिला जखमी झाली आहे. वसई पोलिसांनी या इसमावर गुन्हा दाखल केला असून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

हेही वाचा- शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू ; शिक्षकांची हलगर्जी; कुटुंबीयांचा आरोप

वसई पश्चिमेकडील गिरीज परिसरातील निंबट वाडी या परिसरात राहणारा मायकल कुटीनो परिसरातील भटक्या श्वानांचा उपद्रव वाढल्याने हैराण झाला होता. यामुळे त्याने आपल्या घरातील छऱ्याच्या बंदूकीने या श्वानांना मारण्याचा बेत आखला. शुक्रवारी तो या श्वानांना लक्ष करत असताना अचानक त्याचे लक्ष चुकले आणि यावेळी रस्त्यावरून जात असणाऱ्या सारिका भाईर यांच्या पायाला गोळी लागली. यात गोळी मांडीत घुसल्याने त्या जखमी झाल्या. आणि त्यांना उपचारासाठी बंगली येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मायकलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस नरिक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू ; शिक्षकांची हलगर्जी; कुटुंबीयांचा आरोप

संबंधित बातम्या

धारावीचं टेंडर विशिष्ट व्यक्तीला मिळावं म्हणून सीमावाद पुढे आणला जातोय का? शरद पवार म्हणाले…
ठरलं! टीम इंडियाला मिळाला नवीन प्रशिक्षक; राहुल द्रविडच्या निकटवर्तीयाची BCCI कडून निवड
“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा
Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…
“शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…” महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून निलेश राणेंचा खोचक टोला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
गर्भधारणा झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी शरीरात दिसू लागतात ‘ही’ ५ लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे
‘प्रत्येकाची बुद्धी असते, कोण काय बोलले याकडे मी लक्ष देत नाही’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्षपणे टोला
हम साथ साथ है! शस्त्रक्रिया होताना लालू प्रसादांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब, मुलीने केली किडनी दान
VIDEO: ‘अपना एक स्टाईल है, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’, मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
परेश रावल यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कलमांखाली गुन्हा दाखल