वाडा: गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज गुरुवारी  तिसरम्य़ा दिवशी उग्र रूप धारण केले. पहाट पासुन सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नद्य, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. देहेर्जा नदीवरील ब्राम्हणगांव येथील पुल पाण्याखाली गेल्याने या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने तालुक्यातील तानसा, वैतरणा, पिंजाळी, गारगाई, देहेर्जा या नद्यंना मोठा पूर आला आहे. या नद्यंनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन वाडा प्रशासनाने केले आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंचाड-ब्राम्हणगांव-कुंर्झे या राज्य मार्गावर येत असलेल्या देहेर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या भागातील कडी, कुंर्झे, म्हसरोली, ब्राम्हणगांव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. कुंर्झे येथे असलेल्या माध्यमिक शाळेत  व कनिष्ठ महाविद्यलयात आजूबाजूच्या अनेक खेडेगावातून विद्यर्थी ये-जा करीत असतात.  दुपारनंतर पुल पाण्याखाली गेल्याने सकाळी शाळेत गेलेल्या विद्यर्थ्यांंची कोंडी झाली आहे. अनेक विद्यर्थ्यांंनी आपापल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. तर काही विद्यर्थी पुलावरील पाणी ओसरण्याची वाट पाहत नदी किनारी बसले आहेत.

तालुक्यातील तिळसे – पिंपरोली रस्त्यावरील मोरी पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. वाडा-मनोर या महामार्गावर वरले गावानजीक रस्त्यावर तीन फूट उंचीपर्यंत पाणी आल्याने काही तास येथील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना वाडा तहसीलदार उद्धव कदम यांनी दिल्या आहेत.

कुडूस बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाण्याचा शिरकाव

वाडा:  दोन दिवस कोसळत असलेल्या पावसाने सर्वत्रच दानादान उडवून दिली आहे. भिवंडी – वाडा या महामार्गावर  कुडूस नाका येथे  एका अरूंद मोरीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी तुंबले. तुंबलेले पाणी येथील बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

कुडूस नाका येथील अरुंद मोरीतून पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नसल्याने कमी पावसातही हे पाणी तुंबते आणि तेथील भाग जलमय होतो. गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरु असल्याने येथील संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी झाले आहे. काही दुकानदारांच्या दुकानांमध्ये दोन ते तीन फुट उंचीपर्यंत पाणी भरल्याने मोठय़ा नुकसानाला या दुकानदारांना सामोरे जावे लागले आहे. दरवर्षी या ठिकाणी अति पावसामुळे ही परिस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

कुडूस ही ५२ गावांची बाजारपेठ असून मध्यवर्ती ठिकाण आहे. औद्योगिककरणामुळे  या गावाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कुडूस मध्ये नावाजलेल्या शाळा व बाजारपेठ असल्याने उद्योग धंद्यनिमित्त आलेल्या नागरिकांनी कुडूस मध्ये वास्तव करणे पसंत केले आहे. त्यामुळे या गावाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. आजमितीस १५ ते २० हजार नागरिक येथे वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर नव्याने  इमारती बांधल्या आहेत. या इमारती बांधताना पुर्वापार असलेले पाण्याचे नैसर्गिक मार्ग अडविले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होताना अडथळे निर्माण होत असल्याचे येथील ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flooding rivers palace villages cut off flooding roads bridge ysh