पालघर / बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहती मधील मेडली फार्मास्युटिकल्स (प्लॉट नंबर एफ – १३) या कंपनीत वायू गळती झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कंपनीतील दोन कामगार गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

दुपारी २.३० – ३ वाजल्या दरम्यान या कंपनीत एलबेंडोझोल चे सुरु होते उत्पादन असताना नायट्रोजन द्वारे प्रक्रिया होणाऱ्या टाकी च्या परिसरात नायट्रोजन वायू ची गळती झाली. ज्या ठिकाणी हे कामगार काम करत होते हे सर्व बाधित झाले. त्या ठिकाणी प्राणवायूची मात्रा कमी झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बेशुद्ध अवस्थेत या कामगारांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र चौघांचा आहे मृत्यू झाल्याचे डॉ. स्वप्नील शिंदे यांनी लोकसत्ताला सांगितले. कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज पवार आणि बंगाली ठाकूर या कामगारांना मृत घोषित करण्यात आले असून रोहन शिंदे आणि निलेश अडले या दोन कामगारांवर उपचार सुरू आहेत.

मयतः

  1. कल्पेश राऊत
  2. बंगाली ठाकूर
  3. धीरज प्रजापती
  4. कमलेश यादव

जखमीः-

  1. रोहन शिंदे
  2. निलेश हाडळ