बोईसर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर मस्तान नाका उड्डाणपूलावरून बेस ऑइल या पेट्रोलियम जन्य रसायनाने भरलेला टँकर उलटला. या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या वाहन चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून पेट्रोलियमजन्य पदार्थाला आग न लागल्याने मोठा अनर्थ टाळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुलनात्मक कमी ज्वलनशील अशा बेस ऑइलने भरलेला टँकर राष्ट्रीय महामार्गावरील मनोर येथील उड्डाणपूलावरून कोसळण्याची घटना आज (रविवारी) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असलेला आशिष कुमार यादव (२८) नंतर मनोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर उड्डाणपुलावरून सेवा रस्त्यावर कोसळण्याच्या वेळेस खाली कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

मुंबईकडून गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरमध्ये कमी प्रमाणात ज्वलनशील पदार्थ असल्याने गळती होऊन रस्त्यावर पसरले. अपघातानंतर काही प्रमाणात आग लागली मात्र ती विजविण्यास स्थानिकांनी यश लाभले. सावधगिरीचा उपाय म्हणून पोलिसांनी मस्तान नाका उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

अपघातग्रस्त टँकरचा चालक केबिनमध्ये अडकून पडला होता. मात्र तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून अपघातग्रस्त टँकर मधून गंभीर जखमी झालेल्या चालकाला काही वेळाने उपचारादरम्यान मनोर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In boisar water tanker collapsed from manor bridge driver seriously injured css