पालघर : पालघर जिल्हयातील नविन रस्ते व चालु असलेली रस्त्यांच्या डागडुगीच्या कामकाजाच्या ठिकाणी होणारे अपघात व वाहतुक कोंडी नियोजना बाबत पोलिस अधीक्षक यांनी कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांना सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच कामामुळे कोणत्याही प्रकारचे अपघात होणार व वाहतुक कोंडी होणार नाही याचे नियोजन करण्याचे आदेश बैठकीदरम्यान दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर जिल्हयातुन जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर अनेक ठिकाणी नविन रस्त्यांचे काम तर काही ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी कंत्राटदार यांच्याकडून योग्य नियोजन व उपाययोजनांच्या अभावी होणारे अपघात व वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याबाबत नियोजन करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत २३ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीकरीता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, कार्यकारी अभियंता पालघर, कार्यकारी अभियंता वाडा तसेच महामार्ग (एचएसपी) पोलीस अधिकारी, जिल्हा वाहतुक शाखा पोलीस अधिकारी मनोर, वाडा, भिवंडी, विक्रमगड, झाई, बोर्डी येथील ठेकेदार उपस्थित होते. या बैठकीदरम्यान विविध विभागातील सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता व कंत्राटदार यांना पोलीस अधीक्षक यांनी कामादरम्यान नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नविन रस्ता अगर रस्ता दुरुस्ती करतांना कोणत्याही प्रकारचे अपघात होणार नाहीत तसेच वाहतुक कोंडी होणार नाही याबाबत सक्त सुचना देण्यात आल्या.

अभियंता व कंत्राटदारांना सूचना

राष्ट्रीय अगर राज्य मार्ग नविन बनवितांना अगर दुरुस्ती करतांना आवश्यक त्या विभागांची परवानगी घेवुन त्यांचे सुचनांप्रमाणे कामकाज करावे.मंजूरी शिवाय कामकाज करु नये, स्थानिक जनतेच्या अडीअडची समजुन घेवुन त्यानुसार रस्ता वळविणे अथवा एकमार्ग करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा,रस्ता वळवितांना सुरवातीस पर्यायी मार्ग वाहन चालवण्यास योग्य आहेत का याबाबत खातरजमा करुन रस्ता दुरुस्त करुन पर्यायी मार्ग चालु करावे.
रस्ता दुरुस्त करतांना रस्ता खोदकामाची माती वाहतुकीच्या रस्त्यावर टाकु नये, वाहतुक विभागाचे मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस विभागाकडील सुचनांप्रमाणे ट्रॉफिक वार्डन, ब्लिकर व सिग्नल लाईट, कामचा बोर्ड, लाईट बटन, विजेरी बटनसह नियुक्त केल्यानंतरच कामास सुरवात करावी,

कामाच्या बाजुने संपुर्ण ठिकाणी व्यवस्थित बॅरीकेटींग करुन घ्यावे.कामकाजाच्या ठिकाणी जड-अवजड वाहने बंद पडल्यास ती तात्काळ बाजुला करण्यासाठी मोठ्या क्षमतेची हिप्पो क्रेन व एक रुग्णवाहिका आरक्षित ठेवण्यात यावी.कामामुळे अत्यावश्यक सेवेतील वाहने रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस इत्यादी वाहनांना जाण्यास अडथळा होणार नाही याकरीता पर्यायी मार्ग उपलब्ध असावा याची ठेकेदार कंपनीकडुन दक्षता घेण्यात यावी.संबंधित रस्त्याचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात यावे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे लांबच्या अंतरापर्यंतचे काम सुरु करु नये. तसेच एका वेळी एकाच लेनचे काम करावे व ते पुर्ण झाल्यावरच दुस-या लेनचे काम सुरु करावे.स्त्याचे काम पावसाळयात बंद ठेवुन नंतरचे उर्वरित काम पावसाळा संपल्यानंतरच सुरु करावे. नविन रोडचे अथवा दुरुस्तीचे काम दिलेल्या मुदतीत पुर्ण करावे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sp issues strict instructions on accident traffic planning for new and ongoing palghar roads sud 02