डहाणू: गुजरात राज्याची सीमा व राष्ट्रीय महामार्ग, बुलेट ट्रेन, मुंबई-बडोदा महामार्ग, सुत्रकार- वेळुगाव महामार्ग आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी भूसंपादनाची व मोजणीची महत्त्वाचे कामकाज करणारे तलासरी भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अवघ्या तीन कर्मचारी सांभाळत असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. कर्मचारी रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर राबवली जात असून  उपसंचालक भूमीभिलेख यांच्याकडे त्याबाबत मागणी केल्याचे भूकरमापक रविंद्र वडनेर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तलासरी तालुका हा गुजरात सीमा, केंद्रशासित प्रदेश सीमा, मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असल्याने विकसनशील तालुका आहे. यात उद्योगधंदे व कंपन्यांचा विस्तार होत आहे. तसेच केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी  बुलेट ट्रेन प्रकल्प, सूत्रकार वेळूगाव हायवे, मुंबई वडोदरा हायवे, जात असल्याने भूमिअभिलेख कार्यालयात कामकाजासाठी शासकीय तसेच खासगी अर्जांची संख्या वाढत आहे. तलासरी तालुक्यातील सर्व गावाचे अभिलेख सादर करणे, संपादन करणे, ई महाभूमिलेख कार्यक्रमांतर्गत अभिलेखांचे डिजीटायझेशन करणे, भूमापन नकाशाचे ऑनलाइन माहिती संगणकी करणे, गावांचे विक्री नकाशे तयार करणे यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता आहे.

तलासरी भूमी अभिलेख कार्यालयात भूकरमापक, छाननी लिपीक, शिपाई हे तीन कर्मचारी तालुक्याचा भार सांभाळत आहेत. छाननी लिपीक प्रतिनियुक्तीवर काम करत आहेत. तर कनिष्ठ लिपीक, अभिलेखपाल, भूकरमापक, प्रति लिपि लिपीक, दुरुस्ती लिपीक, शिपाई (३) पदे अशी ९ पदे रिक्त आहेत. तर आस्थापनेवर  वर्ग ३, वर्ग ४ संवर्गातील ९ पदे मंजूर  आहेत. भूसंपादन मोजणी प्रकल्पातील पूर्ततेसाठी मोठ्या संख्येने अर्ज आलेले आहेत. मनुष्यबळा अभावी भूसंपादन होणारे क्षेत्र हे कोणाच्या हिस्यातून जाते याबाबत विलंब होत आहे.

 

गुजरात व महाराष्ट्र सीमेवर तलासरी तालुका असल्याने तसेच बुलेट ट्रेन, बडोदा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग तसेच केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असताना सामान्य लोकांचे काम होण्यासाठी भूमिअभिलेख तलासरी येथे रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. – अशोक धोडी, वेवजी रहिवासी

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State of gujarat borders and national highway bullet train mumbai baroda highway akp