• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. up election richest mla in uttar pradesh hrc

UP Election: ‘हे’ आहेत युपीचे सर्वात श्रीमंत आमदार; जाणून घ्या त्यांचा पक्ष आणि संपत्तीविषयी

२०१७ मध्ये युपीचे सर्वात श्रीमंत आमदार कोणत्या जागेवरून जिंकून विधानसभेत पोहोचले होते ते जाणून घेऊया…

Updated: January 18, 2022 16:31 IST
Follow Us
  • युपीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. त्याच वेळी, अनेक नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलत आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्यामध्ये काही लोक असे आहेत जे या निवडणुकीत नवीन पक्षाअंतर्गत आपले नशीब आजमावतील. २०१७ मध्ये युपीचे ७ सर्वात श्रीमंत आमदार कोणत्या जागेवरून जिंकून विधानसभेत पोहोचले होते ते जाणून घेऊया...
    1/9

    युपीमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. त्याच वेळी, अनेक नेते ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलत आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारांबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्यामध्ये काही लोक असे आहेत जे या निवडणुकीत नवीन पक्षाअंतर्गत आपले नशीब आजमावतील. २०१७ मध्ये युपीचे ७ सर्वात श्रीमंत आमदार कोणत्या जागेवरून जिंकून विधानसभेत पोहोचले होते ते जाणून घेऊया…

  • 2/9

    शाह आलम उर्फ ​​गुड्डू जमाली हे यूपीचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. २०१७ मध्ये त्यांनी आपली संपत्ती सुमारे ११८ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी बसपाच्या तिकिटावर आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. जमाली आता सपामध्ये गेले आहेत.

  • 3/9

    विनय शंकर तिवारी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. २०१७ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर चिल्लुपर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी आपली संपत्ती ६७ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. यावेळी तेदेखील समाजवादी पक्षात गेले आहेत.

  • 4/9

    राणी पक्षालिका सिंह ५८ कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१७ मध्ये त्या भाजपाच्या तिकिटावर आग्राच्या बाह मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या होत्या.

  • 5/9

    भाजपाचे नंद गोपाल गुप्ता नंदी हे ५७ कोटींच्या संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत. ते अलाहाबाद दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

  • 6/9

    त्यानंतरचा क्रमांक भाजपा आमदार अजय प्रताप सिंह उर्फ ​​लल्ला भैया यांचा आहे. त्यांनी एकूण ४९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. ते गोंडाच्या कर्नलगंज मतदारसंघाचे आमदार आहेत.

  • 7/9

    भाजपाच्या शुचिस्मिता मौर्य सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४६ कोटी रुपये आहे आणि त्या मिर्झापूरच्या माझवान मतदारसंघातून आमदार आहेत.

  • 8/9

    बसपाचे उमाशंकर सिंह ४० कोटींच्या संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत. बलियाच्या रसरा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती.

  • 9/9

    वर दिलेल्या आमदारांच्या मालमत्तेचा तपशील त्यांनी २०१७ च्या यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून घेतला आहे. (फोटो – जनसत्ता)

TOPICS
उत्तर प्रदेश निवडणुकाUP Election

Web Title: Up election richest mla in uttar pradesh hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.