• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. who is diya kumari rajasthan assembly election vidhyadhar nagar seat competition to vasundhara raje kvg

दिया कुमारी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री; पालकांविरोधात लग्न, नंतर घटस्फोट, असा आहे राजकीय प्रवास

Diya Kumar New DCM of Rajasthan : आमदार दिया कुमारी यांना भाजपाने उपमुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आहे. वसुंधरा राजे यांना पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Updated: December 12, 2023 19:11 IST
Follow Us
  • Divya kumari
    1/9

    भाजपमध्ये धक्कातंत्राचा अवलंब करण्यात मोदी-शहा ही जोडी प्रसिद्ध आहे. यातूनच राजधानी जयपूरमधील पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने राजसंमद मतदारसंघाच्या खासदार दिया कुमारी यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 2/9

    दिया कुमारी जयपूरचे शेवटचे संस्थानिक महाराज मानसिंह दुसरे यांच्या नात आहेत. जयपूरचे महाराजा, हॉटेल व्यावसायिक भवानी सिंह आणि पद्मिनी देवी यांच्या पोटी दिया कुमारी यांचा जन्म ३० जानेवारी १९७१ साली झाला. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 3/9

    दिव्या कुमारी या शाही राजघराण्याशी निगडित असून त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय भाजपा कार्यकर्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिले आहे. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 4/9

    राजघराण्यातीलच दिया कुमारी यांना पुढे आणून वसुंधराराजे यांना पर्याय म्हणून भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. दिया कुमारी यांचा राजकारणातील प्रवेश हा वसुंधराराजे यांच्यामुळेच झाला. २०१३ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजघराण्यातील दिया कुमारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना सवाई माधोपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पहिल्याच निवडणुकीत त्या निवडून आल्या. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 5/9

    राजस्थानमधील विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून दिया कुमारी यांनी काँग्रेसच्या सीताराम अग्रवाल यांच्याविरोधात मोठा विजय प्राप्त केला आहे. दिव्या कुमारी यांनी १ लाख ५८ हजार ५१६ मते घेऊन ७१ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळविला. (Election Commission Website)

  • 6/9

    व्यवसायाने त्या चार्टड अकाऊंटंट आहेत. राजघराण्याच्या बाहेरील व्यक्ती नरेंद्र सिंह यांच्याशी प्रेमविवाह केल्यानंतर २१ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 7/9

    २०१९ साली दिया कुमारी यांनी ताजमहलवर दावा केला होता. ज्या जमिनीवर ताजमहल बांधला ती जमिन त्यांच्या घराण्याच्या मालकिची असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. असे अनेक वादग्रस्त वक्तव्ये त्यांनी केलेली आहेत. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 8/9

    राजस्थानमध्ये भाजप म्हणजे वसुंधरराजे हे समीकरण तयार झाले होते. पण मोदी-शहा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये वसुंधराराजे यांचे महत्त्व कमी करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून दिया कुमारी यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. (Photo – Diya Kumar Instagram)

  • 9/9

    वसुंधराराजे सरकार असताना जयपूरमधील राजमहालाचे अनधिकृत बांधकाम पाडण्यावरून वाद निर्माण झाला. दिया कुमारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतली होती. राजधानीतीस रजपूत समाजाने भाजप व वसुंधराराजे यांच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यातून वसुंधराराजे आणि दिया कुमारी या दोघींमध्ये वितुष्ट निर्माण झाले. (Photo – Diya Kumar Instagram)

TOPICS
मुख्यमंत्रीManmohan Singhराजस्थानRajasthanराजस्थान निवडणूक २०२३Rajasthan Election 2023वसुंधरा राजेVasundhara Rajeविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024

Web Title: Who is diya kumari rajasthan assembly election vidhyadhar nagar seat competition to vasundhara raje kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.