-
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली.
-
आगामी लोकसभा निवडणूक ही नव्या भारताच्या जडणघणीसाठी महत्त्वाची असून, NDA ला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जनतेने आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन मोदींनी केले.
-
विरोधी इंडिया आघाडीचे नेते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यात गुंतले असून, देशाचा विकास रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. “देशाच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान म्हणून जेव्हा मी हमी देतो, तेव्हा विरोधक माझ्यावर संतप्त होतात.” अशीही टीका या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली.
-
देश बलवान होतो तेव्हा जगाकडून दखल घेतली जाते. देशाचा विकास आणखी वेगाने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
“अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम रोखण्याचे काँग्रेसने अनेक प्रयत्न केले. तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारून त्यांनी रामाचा अपमान केला.” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
-
जनतेने दिलेल्या मदतीतून भव्य राम मंदिर उभे राहिले तेव्हा, काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण तर धुडकावलेच, पण पक्षातील जी मंडळी समारंभाला उपस्थित राहिली त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले. असे म्हणत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
-
राम मंदिर उभारणीतील दिवंगत मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या योगदानाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. काँग्रेस तुष्टीकरणाच्या राजकारणातून बाहेर येऊ शकत नाही. काँग्रेसचा जाहीरनामा पाहता, तो मुस्लीम लीगचा आहे असे वाटते, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.
-
काँग्रेस सरकारच्या काळात जगाकडून भारताला मदत घ्यावी लागत असे, परंतू कोरोनाकाळात जगासाठी भारताने कोरोना लस उपलब्ध करून दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले.
-
(सर्व फोटो साभार- नरेंद्र मोदी, फेसबुक पेज)
Loksabha Election 2024: विरोधकांकडून रामाचा अपमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप
लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभा सध्या सुरु आहेत. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
Web Title: Pm narendra modi latest statement on congress and opposition alliance india about ram mandir and other spl