-
लोकसभा निवडणुकीच्या २०२०४ च्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बलियाचे दिग्गज नेते नारद राय हे सपा सोडून भाजपात दाखल झाले आहेत. (सर्व फोटो- नारद राय या फेसबुक पेजवरुन साभार)
-
नारद राय हे तीन दशकांहून अधिक काळ उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रिय असून भूमिहार समाजाचे मोठे नेते आहेत. नारद राय हे सपा सरकारमध्ये माजी मंत्री आणि माजी आमदारही राहिले आहेत.
-
नारद राय यांच्याकडे लखनऊपासून वाराणसी आणि बलियापर्यंत करोडोंची मालमत्ता आहे. त्याच्याकडे किती मालमत्ता आहे तसेच त्यांचं शिक्षण किती याबद्दल जाणून घेऊया
-
myneta.info वेबसाइटच्या माहितीनुसार, नारद राय हे सुमारे १२ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.
-
त्यांच्याकडे १८ लाख रुपये किंमतीचे सोने असून पत्नीकडे २७ लाख रुपये किंमतीचे सोने आहे. दोघांकडे ४९ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आहेत.
-
नारद राय यांच्याकडे बलिया आणि बक्सरमध्ये ४० लाख रुपयांची शेतजमीन आहे.
-
याशिवाय लखनऊमध्ये त्यांच्या नावावर २ आणि पत्नीच्या नावावर १ एनए प्लॉट्स आहेत, या तिन्हींची किंमत ४ कोटी ८९ लाख १८ हजार रुपये आहे.
-
नारद राय यांचे बलिया येथे दोन आणि वाराणसीमध्ये एक घर आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावरही वाराणसीमध्ये घर आहे. या चार घरांची किंमत ५ कोटी ८५ लाख एवढी आहे.
-
शिक्षणाबद्दल सांगायचे तर, नारद राय यांनी १९८३ मध्ये गोरखपूर विद्यापीठाच्या मुरली मनोहर टाउन पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजमधून कृषी विषयात एम.एस.सी केले आहे.
PHOTOS : समाजवादीतून भाजपात गेलेले नारद राय कोण? लखनऊपासून वाराणसीपर्यंत आहे करोडोंची संपत्ती
Who is Narad Rai, education, qualification property and net worth: लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा शिल्लक असताना सपा नेते नारद राय यांनी भाजपात प्रवेश केला आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे आणि याच भागात राय यांची करोडोंची संपत्ती आहे, यानिमित्ताने राय कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.
Web Title: Who is narad rai who left samajwadi party and joined bjp property in lucknow to varanasi education qualification property net worth and politics spl