-

राज्यामध्ये विधानपरिषदेच्या ४ जागांची निवडणूक हणार आहे. निवडणूक आयोगाने याबद्दल माहिती दिली आहे.
-
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर , नाशिक शिक्षक या चार जागांवर निवडणूक होणार आहे.
-
निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २६ जूनला मतदान होईल. मतमोजणी १ जुलैला करण्यात येणार आहे.
-
३१ मे ते ७ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
-
मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
-
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले शिवाजीराव पक्षाचे जुने नेते आहेत.
-
नलावडे यांनी याआधी दोनवेळा मुंबईच्या पूर्व भागातील मतदारसंघातून विधानसभा निवडणुकी लढली आहे.
-
पदवीधर मतदारसंघातही त्यांनी स्वतःला आजमावून पाहिलंय परंतु त्यातही त्यांना यश मिळालं नाही.
-
सहकार क्षेत्रातील मोठ नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते त्यामुळेच त्यांना ही उमेदवारी मिळाली असल्याची माहिती आहे.
-
यावर्षीची मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पक्ष पूर्ण ताकदीने लढेल आणि पक्षाने दिलेल्या संधीचं सोन करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
-
सर्व फोटो साभार – NCPSpeaks_Official फेसबुक पेज)
मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी अजित पवार गटाने निवडलेले उमेदवार शिवाजीराव नलावडे कोण आहेत?
मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Web Title: Shivajirao nalawade marathi news who is ajit pawar group candidate shivajirao nalawade mumbai teacher elections spl