• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. elections gallery
  4. dimple yadav to iqra hasan 5 women of samajwadi party win lok sabha election 2024 these two became mps at the age of 26 spl

PHOTOS : समाजवादी पक्षाच्या या ५ महिलांची देशभर चर्चा; वयाच्या २५-२७ व्या वर्षी झाल्या खासदार!

समाजवादी पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पाच महिलांना उमेदवारी दिली होती, याच महिला आता देशभर चर्चेमध्ये आल्या आहेत. यामधील दोन महिलांनी अगदी कमी वयात खासदार बनण्याचा विक्रम केला आहे.

Updated: June 5, 2024 17:08 IST
Follow Us
  • Young Women MP
    1/9

    लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ३७ जागांवर समाजवादी पक्षाला यश मिळाले आहे आणि उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा पक्ष अशी ओळखही मिळाली आहे. समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये पाच महिला उमेदवारांना मैदानात उतरवले होते. दरम्यान या निकालानंतर त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे. (Indian Express)

  • 2/9

    या पाचही महिलांनी उत्तर प्रदेशमधील त्यांच्या मतदारसंघांमध्ये विजयी प्राप्त केला आहे. यामध्ये दोन महिला अशा आहेत ज्या खूपच कमी वयामध्ये खासदार बनल्या आहेत.  (Indian Express)

  • 3/9

    समाजवादी पक्षाच्या या महिला उमेदवारांमध्ये पहिला क्रमांक आहे प्रिया सरोज यांचा. यांनी खूपच कमी वयामध्ये खासदार बनण्याचा विक्रम केला आहे. मछली शहर या मतदारसंघातून विजय प्राप्त केलेल्या प्रिया सरोज यांचे वय फक्त २५ वर्षे आहे आणि समाजवादी पक्षाच्या माजी खासदार तुफानी सरोज यांच्या त्या कन्या आहेत. (@Priya Saroj/FB)

  • 4/9

    या यादीत दुसरा क्रमांक आहे इकरा हसन यांचा. यांचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. फक्त २७ वर्ष वय असलेल्या इकरा यांनी कैराना लोकसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या आहेत. भाजपाच्या प्रदीप कुमार यांना ६९ हजार ११६ मतांनी त्यांनी पराभूत केलं आहे. (@Iqra Munawwar Hasan/Fb)

  • 5/9

    इकरा हसन ह्या राजकारणामध्ये फार सक्रिय असतात, कारण त्यांना कुटुंबाकडून राजकारणाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दोघेही खासदार राहिलेले आहेत. आता त्यांचे भाऊ नाहिद हसन हे तिसऱ्यांदा खासदार बनले आहेत. (@Iqra Munawwar Hasan/Fb)

  • 6/9

    समाजवादी पक्षाच्या तिसऱ्या उमेदवार आहेत रुची वीरा. यांनी मुरादाबाद मतदारसंघांमध्ये विजय प्राप्त केला आहे. बिजनोर येथील रहिवासी रुची विरा यांनी भाजपाचे उमेदवार कुंवर सर्वेश कुमार यांना १ लाख ५७ हजार ६३ मतांनी पराभूत केले. (@Ruchi Vira/FB)

  • 7/9

    बांदा या मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या कृष्णा देवी शिवशंकर पटेल यांनी पक्षाच्या विश्वासाला खरं ठरवलं आहे. त्यांनी भाजपाच्या आर के सिंह पटेल यांचा ७१ हजार २१० मतांनी पराभव केला आहे.  (@myneta.info)

  • 8/9

    तर सपाच्या महिला उमेदवारांच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक आहे अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचा. डिंपल यांनी मैनपुरी या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार जयवीर सिंह यांना २ लाख २१ हजार ६३९ मतांच्या फरकाने पराभूत केल आहे. (Indian Express)

  • 9/9

    मुलायम सिंह यादव यांच्या परिवारासाठी मैनपुरी हा मतदारसंघ अगोदरपासूनच महत्त्वपूर्ण राहिला आहे. १९९५ पासून आत्तापर्यंत या मतदारसंघावर मुलायम सिंह यादव यांच्याच परिवाराची पकड राहिली आहे. मुलायम यांच्या निधनानंतर २०२२ मध्ये तिथे केलेल्या पोटनिवडणुकीमध्येही त्यांच्या सून डिंपल यादव यांना विजय मिळाला होता. (Indian Express) हे देखील वाचा- PHOTOS : सर्वात मोठ्या विजयाचा बहुमान ‘या’ उमेदवाराला; मिळाली १२ लाखांहून अधिक मतं!…

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Dimple yadav to iqra hasan 5 women of samajwadi party win lok sabha election 2024 these two became mps at the age of 26 spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.