-
लोकसभा निवडणुकीचे सर्व निकाल हळूहळू आता जाहीर होत आहेत. अनेक मोठ्या लढतींचे निकाल जाहीर झाले आहेत.
-
राहूल गांधी, नरेंद्र मोदी, आणि अमित शाह यांच्या विजयांची नोंद झाली आहे. तेथील मतमोजणी संपली आहे. तर महाराष्ट्रातीलही बऱ्याच ठिकाणचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये मोठे दिग्गज पराभूत झाले आहेत तर अनेकजन विजयी होऊन त्यांच्या गडाला राखून आहेत.
-
पराभूत उमेदवारांमध्ये भाजपच्या भारती पवार यांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
-
त्यानंतर नंबर लागतो तो उज्वल निकम यांचा मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला आहे.
-
महाराष्ट्रातील चर्चेतील मतदारसंघ बारामती येथे सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव केला आहे.
-
मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी राहुल शेवाळे यांचा प्रभाव केला आहे.
-
अमोल किर्तीकर यांच्याकडून रवींद्र वायकर यांचा पराभव.
-
मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव पराभूत.
-
रायगडमध्ये अनंत गीते यांचा पराभव.
-
पुण्यात वसंत मोरे रवींद्र धंगेकर पराभूत.
-
धाराशिवमध्ये अर्चना पाटील पराभूत.
-
सांगलीमध्ये संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील पराभूत.
-
कोल्हापूरमध्ये संजय मांडलिक पराभूत.
-
राजन विचारे ठाण्यात पराभूत.
-
कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांचा पराभव.
-
पालघरमध्ये भारती कामडी यांचा पराभव.
-
शशिकांत शिंदे यांचा सातारा मतदारसंघात पराभव.
-
प्रकाश आंबेडकर यांचा अकोल्यात पराभव.
-
नवनीत राणा यांचा अमरावतीमध्ये पराभव.
PHOTOS: उज्वल निकम, भारती पवार ते प्रकाश आंबेडकर; महाराष्ट्रातील ‘हे’ दिग्गज झालेत पराभूत
Lok Sabha Election Result 2024 : राज्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार अनेक दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. जाणून घेऊया आतापर्यंच्या पराभूत उमेदवारांबद्दल.
Web Title: Candidates lost in maharashtra constituencys latest news of loksabha election results spl