आगामी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात मस्तानीच्या प्रमुख भूमिकेत झळकणा-या दीपिका पदुकोणने अंजू मोदी या डिझायनरसाठी रॅम्पवॉक केला. शाही पोशाखातील दीपिकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात दीपिकाला असाच लूक देण्यात आलेला असून, या चित्रपटासाठी डिझायनर अंजूने कपडे डिझाइन केले आहेत. भरजरी लेहेंगा आणि त्यावर शाही दागिने यामुळे दीपिका फारचं खुलून दिसत होती. नुकतेचं, दीपिकाने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'दिवानी मस्तानी' हे गाणे लॉन्च केले. -
-
मस्तानीचा ‘रॉयल वॉक’
Web Title: Deepika padukones royal walk for anju modis collection at bpfw