-
भारतीय संघाचा शिलेदार विराट कोहलीचे नाव बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत जोडण्यात येते. दोघांमध्ये प्रेमाचे नाते असल्याचे जगजाहीर असले तरी कोहलीला बॉलीवूडमधल्या एक दुसऱयाच अभिनेत्रीवर क्रश होते.
-
प्रसिद्ध आणि प्रगतीच्या शिखरावर असलेल्या विराट कोहलीच्या वैयक्तिक आयुष्याचीही माध्यमे आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. अनुष्कासोबतच्या डेटला घेऊन किंवा या दोघांच्या ब्रेकअप आणि पॅचअपवरून समाजमाध्यमांत जोरदार चर्चा होत असते.
-
पण सध्या कोहली त्याने केलेल्या पहिल्या प्रेमाच्या खुलाशावरून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याचे पहिले प्रेम अनुष्का नसून बॉलीवूडमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर होते.
-
ही अभिनेत्री म्हणजे, करिश्मा कपूर. हो विराटला एकेकाळी करिश्मा कपूर खूप आवडायची. करिश्मा आपले पहिले क्रश असल्याचे खुद्द विराटने एका मुलाखती दरम्यान सांगितले.
-
विराट म्हणाला की, मी कॉलेजात असतानाच्या काळात करिश्मा कपूरची फॅन फॉलोईंग भरपूर होती. ती मला खूप आवडायची. तिचे सिनेमे मी आवर्जुन पाहत असे.
अनुष्का नव्हे..तर या अभिनेत्रीवर होते कोहलीचे क्रश!
Web Title: Virat kohlis first love no its not anushka sharma