Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi award

Zee Marathi Award 2016: झी मराठी पुरस्कार २०१६

October 17, 2016 10:05 IST
Follow Us
  • मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या झी मराठी वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड २०१६’ नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
    1/

    मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या झी मराठी वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड २०१६’ नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • 2/

    प्रेक्षकांचा कौल घेऊन देण्यात येणा-या या सोहळ्यात यंदा बाजी मारली ती ‘काहे दिया परदेस’ या मालिकेने. सर्वोत्कृष्ट मालिकेसह, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायक, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट सासू, लक्षवेधी चेहरा असे तब्बल ११ पुरस्कार या मालिकेने पटकावले.

  • 3/

    सर्व मालिकेतील प्रमुख नायक नायिकेच्या जोड्यांचे बहारदार नृत्य, चला हवा येऊ द्याच्या मंडळींचे हास्यस्फोट आणि वैभव मांगलेच्या सोबतीने मालिकेतील विविध पात्रांचे खुमासदार निवेदन या सर्व गोष्टीने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.

  • 4/

    ‘दिल मराठी धडकन मराठी’ असं ब्रीदवाक्य असलेला आणि मराठीच्या विविध रुपांची गोष्ट आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगणारा हा सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

  • 5/

    झी मराठीवरील मालिंकामधून सध्या राज्यातील विविध भागांतील बोलीभाषा बोलणारी पात्रे बघायला मिळत आहेत. मग ‘माझ्या नव-याची बायको’मधील नागपुरची राधिका असो की ‘रात्रीस खेळ चाले’ मधील मालवणी बोलणारी नाईक कुटुंबातील मंडळी. ‘चला हवा येऊ द्या’च्या महाराष्ट्र दौ-यातून विविध गावांमधील लोककलांचे दर्शनही झाले.

  • 6/

    ‘काहे दिया परदेस’मधून भाषेची सीमा पार करत दोन भिन्न संस्कृतींना एकत्र जोडण्याचं कामही झी मराठी करत आहे. हीच संकल्पना घेऊन यावर्षीचा झी मराठी अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याचं आकर्षण ठरलं ते यातील कलाकारांचे बहारदार परफॉर्मन्सेस.

  • 7/

    ‘माझ्या नव-याची बायको’मधील गुरु, शनाया आणि राधिका म्हणजेच अभिजित खांडकेकर, रसिका आणि अनिता दाते यांच्या नृत्याला प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळाली तर ‘हम आये है यु.पी. बिहार लुटने’ म्हणत शिव आणि गौरीने केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.

  • 8/

    थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेलं होम मिनिस्टरने तर प्रेक्षकांमध्ये हास्यस्फोट घडवून आणले.

  • एकंदरीत नृत्य, हास्य आणि विजेत्यांच्या जल्लोषाने भरलेला हा बहारदार पुरस्कार सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
  • हा बहारदार पुरस्कार सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
  • हा बहारदार पुरस्कार सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

Web Title: Zee marathi award

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.