• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. lalit prabhakar and mrinmayee godbole chi va chi sau ka

चि. व चि. सौ. कां.

May 1, 2017 08:44 IST
Follow Us
  • ‘एलिझाबेथ एकादशी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत.
    1/

    ‘एलिझाबेथ एकादशी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपटानंतर झी स्टुडिओज्, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णी ही त्रयी पुन्हा एकदा चि. व चि. सौ. कां. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी सज्ज झाली आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘सत्यप्रकाश-सावित्रीचा हा लग्नसुडोकू’ मधुगंधा कुलकर्णीच्या लेखणीतून साकारला आहे. चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

  • 2/

    चि. व चि. सौ. कां. हा लग्नबंबाळ, धमाल गोतावळा तसेच सत्यप्रकाश आणि सावित्रीच्या नात्यांचे उलगडत जाणारे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट १९मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 3/

    अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर एक अनोखा ट्रेलर लॉन्च सोहळा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. या सोहळ्याला दिग्दर्शक परेश मोकाशी, लेखिका मधुगंधा कुलकर्णी, अभिनेता ललित प्रभाकर, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, नामवंत गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आणि चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती.

  • 4/

    चित्रपटाची कथा आहे सत्यप्रकाश आणि सावित्री यांची. सावित्री ही प्राण्यांची डॉक्टर व पराकोटीची प्राणीप्रेमी तर सत्यप्रकाश हा इलेक्ट्रीकल इंजिनियर व टोकाचा पर्यावरण प्रेमी. दोघेही विचारांवर ठाम व कामात मग्न. घरच्यांच्या आग्रहाला बळी पडून स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमाला दोघेही मान्यता देतात व एकमेकांना पाहतात देखील.

  • 5/

    त्या दोघांच्या ओळखीचे एक जोडपे नुकतेच वेगळे झालेले असते. प्रेमात आकंठ बुडालेली ती जोडी महिन्याभरातच एकमेकांना वैतागून तुटलेली असते. त्यापासून धडा घेऊन सावित्री – सत्यप्रकाश एक विचित्र निर्णय घेतात आणि त्यांचे कुटुंबिय व मित्रांची एकच भंबेरी उडते. झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ललित प्रभाकर याचा हा पदार्पणातला चित्रपट आहे.

  • 6/

    परेश मोकाशी म्हणाले, "श्री व सौ होण्याच्या प्रवासात, थेट चंद्र सूर्याच्या उपमा देऊन प्रेम करणारे, लग्नानंतर एकत्र राहायला लागल्यावर एकमेकांना चंद्र – सूर्यावर पाठवायला उदयुक्त होतात. लग्न झालेला 'जोडा' तयार झाला की आजकाल खूप लवकर झिजू लागतो. यावर उपाय काय ? त्याचा शोध म्हणजे चि. व चि. सौ. कां."

  • 7/

    मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या चित्रपटात मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, पुर्णिमा तळवलकर, सुनील अभ्यंकर, शर्मिष्ठा राऊत, पुष्कर लोणारकर, भारत गणेशपुरे, ज्योती सुभाष आणि सतीश आळेकर अशी कलाकारांची मांदियाळी आहे. या चित्रपटात एकूण दोन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत नरेंद्र भिडे आणि शब्दबद्ध केली आहे परेश मोकाशी यांनी.

  • 8/

    ‘चि. व चि. सौ. कां.’ हे अकापेला धाटणीचे म्हणजेच गाण्यात कोणतेही वाद्य न वापरता वाद्यांचे आवाज फक्त तोंडाने काढलेले गाणे स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. 'मन हे' हे गाणं लिहिलंय स्वरबद्ध केलंय श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांनी.

  • 9/

    सोशल मिडीयावर या चित्रपटाच्या दोन्ही टिझरला जोरदार प्रतिसाद मिळाला असून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार यात शंका नाही.

  • 10/

    वर्षाच्या सुरूवातीलाच “ती सध्या काय करते” सारखा हिट चित्रपट देणा-या झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चि. व चि. सौ. कां. हा चित्रपट प्रत्येक पिढीतील प्रेक्षकांचे मन जिंकण्यास सज्ज झालाय.

  • 11/

    हा सिनेमा येत्या १९ मे २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: Lalit prabhakar and mrinmayee godbole chi va chi sau ka

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.