-
बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे निधन झाले. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर म्हटल्यावर अनेकांना आठवतो तो त्यांचा बाणेदारपणा दाखवणारा ‘मेरे पास माँ है’ हा एका वाक्याचा संवाद. 'दीवार' या चित्रपटात त्यांनी साकारलेली रवी वर्माची भूमिका आणि हा संवाद आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
-
मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शशी कपूर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. शाळेच्या सुट्टीच्या काळात वडील पृथ्वीराज त्यांना रंगमंचावर काम करण्यासाठी प्रोत्साहीत करायचे.
-
फार कमी अभिनेते स्टार झाल्यानंतर पुन्हा नाटकाकडे वळण्याचे धैर्य दाखवतात. पृथ्वी थिएटरच्या माध्यमातून शशी कपूर यांनी तिथेही योगदान दिले.
-
कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2011 मध्ये शशी कपूर यांचा भारत सरकारने ‘पद्म भूषण’ प्रदान करुन गौरव केला होता. 2014 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कारही शशी कपूर यांना बहाल करण्यात आला होता.
-
लोकप्रियतेच्या शिखरावर असताना केवळ कलात्मकतेच्या ओढीने काही नवोदित दिग्दर्शकांसोबत अत्यंत थोडक्या मोबदल्यात त्यांनी काम केले होते.
‘रवी वर्मा’ काळाच्या पडद्याआड
Web Title: Legendary actor shashi kapoor passes away some facts about him