-
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. सर्वांच्याच लाडक्या जोडीने विवाहबंधनात अडकत एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांच्या नात्यात आलेल्या या सुरेख वळणाबद्दल चाहत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने अनोख्या 'विरुष्का'ला शुभेच्छा देण्यात सुरुवात केली. कोणी गाणे गात, कोणी त्यांचे फोटो पोस्ट करत, कोणी हटके कॅप्शन देत त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वात खास शुभेच्छा ठरल्या त्या म्हणजे वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
-
सुदर्शन यांनी विराट आणि अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी ओडिशा येथील पूरीच्या समुद्रकिनाऱ्यावर भव्य वाळू शिल्प साकारले आहे. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
-
क्रिकेट विश्वात विराटचा वावर पाहता त्याच्या व्यक्तीमत्त्वाला आणि खेळाला साजेशा गोष्टी या वाळू शिल्पात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
-
चित्रपट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अनुष्कासाठी सुदर्शन यांनी चित्रपटाची फितही या शिल्पात साकारली आहे. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
-
वाळू शिल्पाच्या मध्यभागी हृदयाच्या आकारात त्यांनी मोठ्या कलात्मकतेने नववधू आणि वराच्या रुपातील विराट, अनुष्काची प्रतीकृती साकारली आहे. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
-
क्रिकेट आणि चित्रपट जगताला पुन्हा एकदा एका नव्या परिभाषेतून सर्वांसमोर आणणाऱ्या विराट, अनुष्कासाठी सुदर्शन यांनी दिलेल्या या शुभेच्छा खास असणार यात शंका नाही. (छाया सौजन्य- सुदर्शन पटनायक / ट्विटर)
वाळू शिल्पात अवतरली विराट-अनुष्काची लव्हस्टोरी!
Web Title: Sand artist sudarsan pattnaik congratulate cricketer virat kohali and actress anushka sharma for their wedding