-
बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगना रणौतने तिच्या करिअरसाठी मनालीहून मुंबईची वाट धरली होती. मात्र, तिचे मन नेहमीच मनालीत अडकलेलं होते. त्यामुळेच कंगनाने गृहनगर हिमाचल मधील मनालीमध्ये एक सुंदर बंगला नुकताच खरेदी केला. स्वप्नवत वाटणारा हा बंगला अतिशय सुंदर आहे. कंगनाच्या फॅन क्लबने तिच्या या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (छाया सौजन्य : ट्विटर)
-
कंगनाच्या या बंगल्याचं काम आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलं असून, तिथल्या स्थानिकांमध्येही कंगनाच्या नव्या घराविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. (छाया सौजन्य : ट्विटर)
-
कंगनाच्या या नव्या घरापाशी अनेकांनीच सेल्फी काढण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर, शेजारच्या काही मंडळींनी सर्वसामान्य शेजाऱ्यांप्रमाणे कंगनाला काही घरगुती गोष्टींसाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. (छाया सौजन्य : ट्विटर)
-
बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. (छाया सौजन्य : ट्विटर)
-
खासगी आयुष्यात घडलेल्या बऱ्याच गोष्टींमुळे कंगना गेल्या वर्षभरात प्रकाशझोतात राहिली. पण, या साऱ्याचा तिने तिच्या आयुष्यावर फारसा परिणाम होऊ दिला नाही. (छाया सौजन्य : ट्विटर)
क्वीन कंगनाचा नवा आशियाना
Web Title: Is this kangana ranauts new home in manali pics are breathtaking