-

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित पुन्हा एकदा ९०च्या दशकातील आठवणींमध्ये रममान झाली. त्यामागचे कारणही तसे होते. माधुरीला तिचे जुने सहकलाकार आमिर खान, अनिल कपूर यांची साथ मिळाली होती. निमित्त होते 'टोटल धमाल' या तिच्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताचे.
-
नुकताच 'टोटल धमाल' चित्रपटाचा मुहूर्त झाला. यावेळी आपल्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असलेल्या आमिर खानने विशेष उपस्थिती लावली होती. 'टोटल धमाल'च्या मुहूर्ताचा क्लॅप आमिरनेच दिला.
-
'टोटल धमाल'मुळे तब्बल १७ वर्षानंतर माधुरी आणि अनिलची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या जोडीने 'बेटा', 'राम लखन', 'परिंदा' या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
-
अजय देवगण 'टोटल धमाल' चित्रपटाची सहनिर्मिती करत आहे.
-
'धमाल' फ्रँचाइजीमधील 'टोटल धमाल' हा तिसरा चित्रपट असेल.
-
'टोटल धमाल'मध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारत असून, त्याच्यासोबत रितेश देशमुख, अर्षद वारसी आणि जावेद जाफ्री यांच्याही भूमिका आहेत.
माधुरी, अजय, अनिलची ‘टोटल धमाल’
Web Title: Total dhamaal aamir khan gives the mahurat clap madhuri dixit feels she is back to the 90s with anil kapoor ajay devgn