-
लग्न म्हटलं की नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांचा कल्ला, कोणाची हळूच होणारी नजरानजर या सर्व गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. लग्नघर कोणाचेही असो, मित्रमंडळींच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा पार पडतच नाही. त्यातही थेट बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध व्यक्तीच तुमच्या लग्नात येऊन धमाल करण्यात व्यग्र असेल तर त्या लग्नालाही सेलिब्रिटी टच मिळतो असेच म्हणावे लागेल. सध्या आलिया भट्टच्या मैत्रीणीच्या लग्नातही असेच वातावरण पाहायला मिळतेय. कारण, 'बीएफफ' आलिया मैत्रिणीच्या लग्नात धमाल करतेय. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सोशल मीडियावर आलियाच्या मैत्रिणीच्या लग्नातील काही फोटो व्हायरल झाले आहेत. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
खुद्द आलियानेही या लग्नातील काही फोटो शेअर केले. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) -
खास मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यात आलियाने 'हवा हवा' या गाण्यावर ठेकाही धरल्याचे पाहायला मिळाले. याविषयीचा एक व्हिडिओसुद्धा चर्चेत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
आलियाचा हा पिवळ्या रंगाचा घेरदार ड्रेस अनेकजणींच्या पसंतीस उतरला असून, आपल्या वॉर्डरोबमध्येही असा एखादा ड्रेस असावा अशी इच्छा अनेकींनी व्यक्त केलीये. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
सेलिब्रिटी असली तरीही आलिया तिच्या मित्रपरिवाराला नेहमीच प्राधान्य देते याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
(छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
मैत्रिणीच्या लग्नात आलियाचीच ‘हवा हवा’!
आलियानेही काही फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Bollywood actress alia bhatt dance hawaa hawaa best friends wedding ceremony celebrity