-
सध्या सर्वत्र संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाला देशभरातून विरोध होत असतानाही ‘पद्मावत’ने तीनच दिवसांत कमाईचा उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी दीपिका पदुकोण हरकून गेली असून तिने नुकताच वरिष्ठ सिनेपत्रकारांसह चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा केला. जुहू येथील महाराजा भोग थाली रेस्तराँमध्ये तिने राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला.
दीपिकाने यावेळी पारंपरिक पोशाखाला प्राधान्य दिले होते. तिने हिरव्या रंगाचा लांब कुर्ता आणि शरारा घातला होता. -
दीपिकाने तिच्या चाहत्यांसोबत सेल्फीसुद्धा काढले.
-
राजस्थानी पदार्थांचा आस्वाद घेताना दीपिका.
-
करणी सेना आणि इतर संघटनांचा विरोधानंतर अखेर २५ जानेवारीला पद्मावत सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
पद्मावत चित्रपटात दीपिकाने राणी पद्मामवतीची मुख्य भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
-
माफिया क्वीन सपना दीदीवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणाला दीपिका लवकरच सुरुवात करणार आहे. विशाल भारद्वाज या चित्रपटाचे दिग्दर्शन करतील.
दीपिकाने घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद
Web Title: Deepika padukone celebrates padmaavats success