-
अनपेक्षितपणे व्हायरल झालेल्या एका गाण्याच्या व्हिडिओतून अवघ्या काही सेकंदासाठी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रिया वरियर सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतेय. ‘उरू अदार लव्ह’ या चित्रपटातील 'मानिक्य मलरया पूवी' या गाण्याने प्रियाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. सध्या याच प्रसिद्धीची लाट पाहता चित्रपट निर्मात्यांनी 'उरू अदार लव्ह'च्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात कोची येथील लूलू मॉलपासून करण्यात आली. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
यावेळी लाल रंगाच्या सुरेख गाऊनमध्ये प्रिया पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकून गेली. प्रियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
यावेळी छायाचित्रकारांनीही प्रियाची झलक टीपण्यास क्षणाचाही विलंब केला नाही. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
चेहऱ्यावरील हावभावांच्या सहाय्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रियाने यावेळी तिच्या अभिनयाची झलकही दाखवली. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
प्रियासोबतच यावेळी अभिनेता रोशन रहूफही उपस्थित होता. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
सोशल मीडियावर प्रिया प्रकाश वरियर याच नावाची चर्चा सुरु असून, प्रत्येकाच्या टाईमलाइनवरही या मल्याळम अभिनेत्रीचं अधिराज्य पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- Photo by APH Images)
-
(छाया सौजन्य- Photo by APH Images)
प्रियाला पाहण्यासाठी चाहते सैराट
प्रियाने यावेळी तिच्या अभिनयाची झलकही दाखवली.
Web Title: Viral song manikya malaraya poovi fame malyalam actress priya prakash varrier wows kochi