-
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सध्या भारत दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, राजकीय वर्तुळात ट्रुडो यांच्या भारत दौऱ्याच्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. यात कलाविश्वही मागे नाही. दुसऱ्या देशातील राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी भारत भेटीवर आल्यानंतर कलाविश्वातूनही त्यांचे स्वागत केले जाते. कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट घेण्यासाठीसुद्धा मंगळवारी मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये नामवंत व्यावसायिक आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
यामध्ये अभिनेता शाहरुख खानचीही उपस्थिती पाहायला मिळाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
जस्टीन ट्रुडो, शाहरुख खान (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
किंग खानने यावेळी ट्रुडोंच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्याशिवाय अभिनेते अनुपम खेर यांनीही ट्रुडो यांची भेट घेत सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
अभिनेते अनुपम खेर यांनीही ट्रुडो यांची भेट घेत सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
-
फरहान अख्तरनेही या खास भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं.
-
जस्टीन ट्रुडो यांच्यासोबत अभिनेता आर. माधवन
बॉलिवूड सेलिब्रिटी ट्रुडो यांच्या भेटीला
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सध्या भारत दौऱ्यावर आहेत.
Web Title: Bollywood celebrities meets canadian prime minister justin trudeau film industry shah rukh khan farhan akhtar