-
आपल्या अदांनी रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्रीदेवी आज आपल्यात राहीली नाही. मात्र तिचे सौंदर्य आणि तिने गाजवलेल्या विविध भूमिका कायमच आपल्या स्मरणात राहतील. मॉम या तिच्या शेवटच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने कलकत्ता येथे केलेला हा खास लूक
-
स्टाइल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी कोणत्याही पेहरावात खुलून दिसायची. देखणे रुप, अभिनयावर असणारी पकड आणि नृत्य यांमुळे तिने ८० ते ९० च्या दशकात चित्रपट रसिकांवर अक्षरश: आपली छाप पाडली. पण तिची अचानक झालेली एक्झिट सर्वांसाठीच चटका लावून जाणारी आहे.
-
श्रीदेवी ही अतिशय साधी अभिनेत्री म्हणूनही प्रसिद्ध होती. तिच्या डोळ्यांची मोहक अदा आणि त्यामुळे सर्वच कपड्यांमध्ये उठून दिसणारी ती लक्षवेधक होती. अनेकांसाठी हृदयाच्या जवळ असणारी ही अभिनेत्री आणि तिचा अभिनय कालातित आहे यात शंका नाही.
-
वयाच्या ५४ व्या वर्षीही तरुण दिसणारी आणि तितक्याच दमाने कमबॅक करणारी अभिनेत्री आपल्यात नाही हे पचवणे अवघड आहे. तिच्या अचानक जाण्याने बॉलिवूडचे मोठे नुकसान झाले आहे.
-
बाथटबमध्ये पडल्यामुळे दुबईमध्ये मृत्यू झालेली ही अभिनेत्री आपल्यात नाही हे पचवणे भारतीयांसाठी अतिशय अवघड आहे. आज त्यांना मुंबईत आणण्यात येणार असून त्यांच्या चाहत्यांनी कालपासूनच त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
Photos : सौंदर्य ‘श्री’च्या मोहक अदा
मनमोहक अदा
Web Title: Photos shridevi death in dubai bollywood famous actress