Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actors who died young sridevi madhubala jiah khan pratyusha banerjee and others

या अभिनेत्रींना मृत्यूने अवेळी गाठलं

अर्ध्यावरच सोडला आयुष्याचा डाव..

Updated: September 10, 2021 14:20 IST
Follow Us
  • बॉलिवूडची 'चाँदनी' म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीची अकाली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. ५४ व्या वर्षी दुबईत त्यांचे निधन झाले. या कलाविश्वात श्रीदेवीसारखेच असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना अवेळी मृत्यूने गाठलं.
    1/7

    बॉलिवूडची 'चाँदनी' म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीची अकाली एक्झिट बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. ५४ व्या वर्षी दुबईत त्यांचे निधन झाले. या कलाविश्वात श्रीदेवीसारखेच असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना अवेळी मृत्यूने गाठलं.

  • 2/7

    दिव्या भारती- हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमधून ९० चे दशक गाजवलेली अभिनेत्री दिव्या भारतीचे लाखो चाहते आहेत. यश, प्रसिद्धी, ऐश्वर्य असे सगळे काही तिच्या पायाशी लोळण घेत होते. यशाच्या शिखरावर असतानाच वर्सोवा येथील तुलसी बिल्डिंगच्या पाचव्या माळ्यावरील बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला. त्यावेळी ती १९ वर्षांची होती. तिने आत्महत्या केली असावी असाच अंदाज अनेकांकडून व्यक्त करण्यात येतो.

  • 3/7

    मधुबाला- बॉलिवूडमध्ये एक वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रीचे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी हृदयाला छिद्र असल्यामुळे निधन झाले होते. अलौकिक सौंदर्य म्हणजे काय असू शकतं हे दाखवणारं हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मधुबाला. त्या सौंदर्याला अदभुत अभिनयाची जोड दिली ती मधुबालाने.अशा प्रकारचं सौंदर्य आणि अभिनयाचा मिलाफ जगात फार कमी पहायला मिळतो.हिंदी चित्रपटसृष्टीने मधुबालाच्या निमित्तानं अनुभवण्याची संधी भारतीय सिनेरसिकांना दिली.

  • 4/7

    रिमा लागू- अभिनेत्री रिमा लागू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ५९ वर्षीय रिमा यांना छातीत दुखत असल्यामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.

  • प्रत्युषा बॅनर्जी- ‘बालिका वधू’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली ‘आनंदी’ म्हणजेच प्रत्युषा बॅनर्जीने गळफास लावून आत्महत्या केली होती. प्रेम संबंधातील चढउतार हे या आत्महत्येमागचे कारण असल्याचे मानले जाते. आयुष्याचा डाव अर्ध्यावरच सोडून गेलेली प्रत्युषा अनेक प्रश्न मागे सोडून गेली.
  • जिया खान- अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'नि:शब्द' या चित्रपटात झळकलेल्या जिया खानने २०१३मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या या आत्महत्येनंतर बरेच प्रश्न निर्माण झाले.
  • स्मिता पाटील- आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटरसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांनी अवघ्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मराठी व हिंदी दोन्‍ही चित्रपटसृष्‍टीवर दोन दशके अधिराज्‍य गाजवणा-या या अभिनेत्रीने हिंदी-मराठी रसिकांना रडवले, हासवले, विचार करायला भाग पाडले.

Web Title: Actors who died young sridevi madhubala jiah khan pratyusha banerjee and others

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.