-

'बदन पे सितारे' असो किंवा 'मग क्या हुआ तेरा वादा' असं म्हणत मनात कालवाकालव करणारा प्रश्न असो. प्रत्येक गाणं हे तितक्याच प्रभावीपणे आणि भावनांची जोड देत गाण्याची कला जर कोणत्या गायकाला अवगत असेल, तर निर्विवादपणे एकच नाव सर्वांसमोर येतं. ते नाव म्हणजे मोहम्मद रफी यांचं. 'रफी म्हणजे मनाच्या सागरात स्वच्छंद सैर करणारी एक नाव…. रफी म्हणजे कोणीतरी घेतलेला आपल्या अंतर्मनाचा ठाव असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी रफी म्हणजे सबकुछ…' असा गायक होणे नाही, असं म्हणणाऱ्या प्रत्येक चाहत्याच्या आयुष्यात मोहम्मद रफींना मानाचं स्थान आहे. ते आज आपल्यात नसले तरीही गाण्यांच्या माध्यमातून त्यांचा वावर मात्र सतत आपल्यात आहे हे नाकारता येणार नाही. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
शास्त्रीय संगीतापासून भजन आणि ठुमरी अशा कोणत्याही गाण्याच्या प्रकारांमध्ये रुळणाऱ्या या महान गायकाचा आज स्मृतिदिन. याच दिवसाच्या निमित्ताने त्यांचे काही दुर्मिळ फोटो लोकसत्ता तुमच्या भेटीला घेऊन आलं आहे. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
हिंदी चित्रपटसृष्टीचे दादामुनी म्हणजेच अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
मोहम्मद रफी आणि संगीत दिग्दर्शक जोडी, लक्ष्मीकांत- प्यारेलाल. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
गाण्याच्या रेकॉर्डिंगपूर्वी सराव करताना मोहम्मद रफी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
आशा भोसले यांना आपल्या मुलाची ओळख करुन देताना मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज
-
मातब्बर कलाकार एकाच फ्रेममध्ये कैद झालेला तो क्षण. लतादीदीं, संगीतकार नौशाद आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
असेही रफी…. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मोहम्मद रफी. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
मोहम्मद रफी आणि पंडीत जवाहरलाल यांचं दुर्मिळ छायाचित्र. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
-
'जयदेव' चित्रपटाच्या सेटवर मोहम्मद रफी यांच्यासोबत अभिनेते देव आनंद आणि सुनील दत्त. (छाया सौजन्य- एक्स्प्रेस आर्काइव्ज)
जब कभी भी सुनोगे गीत मेरे…
Web Title: Singer mohammed rafi death anniversary