
कतरिना कैफ – 'बूम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. आपल्या सुंदरतेमुळे अनेक चाहत्यांना घायाळ करणारी कतरिना चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रचंड वेगळी दिसायची. श्रद्धा कपूर – बॉलिवूडमध्ये आपल्या खट्याळ स्वभावामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या श्रद्घामध्ये म्हणावा तसा फारसा बदल झालेला नाही. मात्र तिचा ग्लॅमर्स अंदाज नक्कीच बदलला आहे. आलिया भट – राजी चित्रपटामध्ये उत्तम अभिनय करत स्वत:च स्वतंत्र नाव निर्माण करणारी अभिनेत्री आलिया भट आज प्रत्येक चाहत्याच्या मनात घर करुन आहे. मात्र लोकप्रियता मिळविणारी आलिया चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी एका सर्वसामान्य मुलींप्रमाणे वावरत असे. परंतु चंदेरी दुनियेत तग धरुन राहायचं असेल तर स्वत:मध्ये बदल केल्याशिवाय पर्याय नाही हे जाणून आलियाने तिच्यात कमालीचा बदल केला. दीपिका पदुकोण – 'मस्तानी' या नावाने सर्वश्रुत झालेली दीपिका आता जरी बोल्ड आणि बिंधास्त अंदाजात दिसत असली तरी कधी काळी दीपिका प्रचंड वेगळी दिसायची. मात्र चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर दिपिकाने स्वत: मध्ये अमुलाग्र बदल केला आहे. सोनम कपूर – बॉलिवूडची 'फॅशनिस्टा' सोनम कपूर तिच्या लूकमुळे कायमच चर्चेत असते. मात्र आजची फिशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी सोनम किशोरावस्थेत प्रचंड वेगळी दिसत असे. विशेष म्हणजे या वयात ती वाढत्या वजनामुळे त्रस्त होती. प्रियांका चोप्रा – 'देसी गर्ल' ते 'क्वांटिको गर्ल' अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारी प्रियांका कधी काळी प्रचंड लाजरीबुजरी होती. मात्र याच प्रियांकाने २००० साली 'मिस वर्ल्ड' विजेती ठरली आणि तिची लाईफस्टाईल पूर्णपणे बदलून गेली.
बॉलिवूडच्या तारका तेव्हा आणि आता
प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते.
Web Title: 6 actress and their weird look before enter in bollywood