
शम्मी कपूर – कायम आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या शम्मी कपूर यांनी 'शहीद भगत सिंग' हा चित्रपट केला होता. या चित्रपटामध्ये ते प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. के. एन. बन्सल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये शकीला, प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव हे कलाकारही झळकले होते. मनोजकुमार – संपूर्ण देशामध्ये भारत कुमार या नावाने ओळखले जाणारे मनोज कुमार यांनीदेखील काही देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र १९६५ साली आलेल्या शहीद या चित्रपटामुळे त्यांना विशेष नावलौकिक मिळाला. या चित्रपटामध्ये त्यांनी शहीद भगतसिंग यांची भूमिका वठविली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटानंतर त्यांनी 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यासारखे चित्रपटही केले. सोनू सूद – बॉलिवूडमध्ये कमी चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे सोनू सूद. सोनू सूदने जरी कमी चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी त्यानेदेखील निवड चित्रपटांची निवड केल्याचं पाहायला मिळतं. त्याच्याच निवडीचं एक उदाहरण म्हणजे २००२ साली प्रदर्शित झालेला 'शहीद-ए-आझम'. भगत सिंग यांच्या जीवनावर साकारलेल्या या चित्रपटामध्ये सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत रसिकांसमोर आला होता. अजय देवगण – २००२ साली प्रदर्शित झालेला 'द लेजंड ऑफ भगत सिंग' या चित्रपटामध्ये अजय देवगण भगतसिंग यांच्या भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटामध्ये इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास आणि त्यांच्या देशप्रेमाचे चित्रण करण्यात आलं आहे. या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून बेस्ट फिचर फिल्म म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे. बॉबी देओल – '२३ मार्च १९२३: शहीद' या चित्रपटाची निर्मिती सनी देओल, बॉबी देओल या दोघांनी केली आहे. या चित्रपटामध्ये देओल बंधू आणि अमृता सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये भगतसिंग यांच्याबरोबर राजगुरु आणि सुखदेव यांच्या देशकार्याचा आढावा देखील घेण्यात आला होता. सिद्धार्थ नारायण – आजच्या तरुणाईला भगतसिंग यांचं देशप्रेम आणि त्यांचं बलिदान समजावं यासाठी २००६ साली रंगद दे बसंती या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. भगत सिंग आणि इतर देशभक्तांचा तरुणाईवर असणारा प्रभाव या चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेमध्ये झळकला आहे.
भगतसिंग यांच्या भूमिकेतील तुमचा आवडता अभिनेता कोण ?
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमधून विविध कलाकारांनी शहीद भगत सिंग यांची भूमिका साकारली आहे.
Web Title: 6 bollywood actors who play shaheed bhagat singh role