अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक यांनी आपल्या नात्याला वेगळं नाव दिलं असून, त्याची आज शनिवावी अधिकृत घोषणाही झाली.
कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत प्रियांकाचा रोका पार पडला असून, खऱ्या अर्थाने या सेलिब्रिटी जोडीने त्यांच्या नात्याची कबुली देत साखरपुड्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतात प्रियांका आणि निकच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत या दोघांच्याही नात्याला नवी ओळख मिळाली
साखरपुड्यानंतर कुटुंबियांसोबत फोटोही काढले. सध्या घडीला सोशल मीडिया आणि संपूर्ण कलाविश्वात प्रियांकाच्याच साखपुड्याची चर्चा होत आहे
आपल्या आयुष्यातील या खास वळणावर आलेल्या प्रियांकाच्या चेहऱ्यावर यावेळी आनंदलहरी पाहायला मिळत होत्या.
प्रियांकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर, निक पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये तिला शोभून दिसत होता
उपस्थितांनीही यावेळी प्रियांका आणि निकला शुभाशिर्वाद दिल्याचं पाहायला मिळालं.
प्रियांकाचा साखरपुडा याआधीच पार पडला होता. पण, पारंपरिक पद्धतीने रोका पार पडला
यावेळी बॉलिवूडसह सर्वच ठिकाणावरील मित्रमंडळींनी हजेरी लावली होती.
दोघांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
प्रियांकाला शुभेच्छा देण्यासाठी आता नेमकं कोण हजेरी लावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Web Title: Here are all the pics from priyanka chopra nick jonas picture perfect engagement ceremony