मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. २५ जून १९८६ रोजी सांगलीतील एका कुटुंबात सईचा जन्म झाला. मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून सई प्रसिद्ध आहे. 'नो एण्ट्री पुढे धोका आहे' चित्रपटातील बिकिनी सीनमुळे सई बरीच चर्चेत आली होती. मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 'या गोजिरवाण्या घरात' मालिकेने सईने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. 'अनुबंध', 'अग्निशिखा', 'तुझं माझं जमेना', 'साथी रे' या मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 'सनई चौघडे' या चित्रपटाने सईचे आयुष्य बदलले. या चित्रपटाने तिला मराठी चित्रपटसृष्टीत नाव मिळवून दिले. 'दुनियादारी', 'सौ. शशी देवधर', 'बालक पालक', 'टाइम प्लीज', 'तू ही रे', 'वजनदार', 'वायझेड', 'क्लासमेट्स' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. -
'मीडियम स्पाइसी' चित्रपटाच्या सेटवर सईचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
Happy Birthday sai : सही रे सई
Web Title: Sai tamhankar birthday special intresting facts ssj