बॉलिवूडचा खलनायक क्राईम मास्टर गोगो म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस. शक्ती कपूरचं खरं नाव सुनील सिकंदरलाल कपूर असं आहे. 'कुर्बानी' चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेने शक्ती कपूर यांनी सर्वांना लक्षवेधून घेण्यास भाग पाडले. सततच्या खलनायकाच्या भुमिकेनंतर शक्ती कपूर यांना 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटात वेगळ्या धाटणीची भूमिका मिळाली. १९८३ सालच्या हिम्मतवाला चित्रपटातील खलनायकाची भूमिका शक्ती कपूर यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणारी होती. 'हिरो' चित्रपटात शक्ती कपूर यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका हिंदी चित्रपटसृष्टीसाठी मानबिंदू ठरली. १९९४ हे वर्ष शक्ती कपूर यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. सुपरहिट 'राजा बाबू' चित्रपटातील नंदूच्या भुमिकेमुळे शक्ती कपूर यांच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आणि या भूमिकेला ९० च्या दशकात प्रचंड प्रसिद्धी मिळाली. 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील शक्ती कपूर यांच्या 'क्राइम मास्टर गोगो'ची भूमिका भरपूर गाजली.
हॅपी बर्थ डे ‘क्राइम मास्टर गोगो’
Web Title: Bollywoods favourite villain shakti kapoor birthday special ssj