'ससुराल सिमर का' या मालिकेत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री व 'बिग बॉस १२'ची विजेती दीपिका कक्कर इब्राहिम 'कहाँ हम कहाँ तुम' या मालिकेत एका नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. दीपिकाचा 'मराठी मुलगी' अंदाजातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणेशोत्सवानिमित्त नऊवारी साडी, नथ, दागिने असा पारंपरिक साजश्रृंगार तिने केला आहे. शूटनिमित्त सेटवर आलेल्या ढोलपथकासोबत दीपिकाने मिळून ढोलसुद्धा वाजवला. -
ढोल वाजवतानाचा व्हिडीओ दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.
-
मराठमोळ्या अंदाजातील दीपिका सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
‘बिग बॉस १२’ विजेती दीपिका कक्करचा मराठमोळा लूक
मराठमोळ्या अंदाजातील दीपिका सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे.
Web Title: Dipika kakar ibrahim nails the marathi mulgi look watch photos ssv