
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च स्थान निर्माण केलं बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज वाढदिवस आहे रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन. पण, अजूनही बऱ्याचशा लोकांना हे नाव माहित नाही बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. १९८१ साली आलेल्या मुजफ्फर अली निर्मित ‘उमराव जान’ने रेखा यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठंठ जायाच हनिमुनला..’ या लावणीवर त्यांनी केलेले नृत्य प्रचंड गाजले. -
Happy Birthday : सदाबहार ‘रेखा’
बेबी रेखा या नावाने त्यांनी प्रथम तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले
Web Title: Happy birthday rekha actress proved she is real diva of bollywood ssj