
मराठी मालिका आणि नाटकांद्वारे रसिकांच्या मनावर आपली छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशीचा आज वाढदिवस. स्पृहाचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या स्पृहाला लेखनाचीही आवड आहे. शाळेत असताना तिला सर्जनशील लिखाणासाठीचा ‘बालश्री २००३’ पुरस्कारही मिळाला होता. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) ‘दे धमाल’ या मालिकेमुळे ती पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) रुईया कॉलेजच्या मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्या ‘शाळा’ या कादंबरीवर आधारित ‘गमभन’ या एकांकिकेमध्ये तिने साकारलेले शिरोडकर हे पात्र चांगलेच गाजले. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) त्यानंतर तिने ‘युग्मक’, ‘अनन्या’ अशा एकांकिकांमध्ये उत्तम भूमिका साकारली आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) ‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज) तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. (छाया सौजन्यः स्पृहा जोशी- फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज)
Happy Birthday Spruha Joshi: हॅप्पी बर्थडे स्पृहा..
‘दे धमाल’ या मालिकेमुळे ती पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली
Web Title: Happy birthday spruha joshi ssj