
'रात्रीस खेळ चाले २' मालिकेतल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. यामध्ये 'वच्छी'ची सून शोभा हिनेसुद्धा अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. शोभाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंगल राणे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. मंगल या मालिकेत नेहमीच साड्यांमध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या आयुष्यात ती खूपच वेगळी आहे. ती अनेकदा पाश्चिमात्य कपडे घालते. तिचे खऱ्या आयुष्यातील फोटो पाहिल्यानंतर 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेत शोभाची भूमिका साकारणारी मुलगी हीच का, असा प्रश्न नक्की पडतो. मंगल ही अत्यंत चंचल पण तेवढीच दानशूर असल्याचं तिच्या मित्रमैत्रिणी सांगतात. मंगलने 'गाव गाता गजाली' या मालवणी मालिकेतही भूमिका साकारली आहे. त्याचसोबत अनेक पारितोषिक पटकावणाऱ्या 'रेडू' या चित्रपटातही ती झळकली. आता 'रात्रीस खेळ चाले 2' या घराघरात पोहोचलेल्या मालिकेतून तिच्या कामाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतेय.
‘रात्रीस खेळ चाले २’मधील वच्छीच्या सूनेचा अनोखा अंदाज
मंगल या मालिकेत नेहमीच साड्यांमध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या आयुष्यात ती खूपच वेगळी आहे.
Web Title: Ratris khel chale 2 vacchi daughter in law shobha aka mangal rane photos ssv