'बजरंगी भाईजान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्रा साऱ्यांनाच आठवत असेल. -
'मुन्नी' ही व्यक्तिरेखा साकारत हर्षालीने अनेकांची मन जिंकली. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेलं स्मित हास्य आजही प्रेक्षकांना भुरळ घालते.
-
'बजरंगी भाईजान'मधून नावारुपाला आलेली हर्षाली आता ११ वर्षांची झाली असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टिव्ह असलेल्या हर्षालीने ३ जून रोजी तिचा ११ वा वाढदिवस साजरा केला. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या एखाद्या बड्या स्टारप्रमाणेच आहेत. 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात झळकण्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. यापूर्वी ती 'कुबूल है', 'लौट आओ तृषा' आणि 'सावधान इंडिया' या मालिकेत काम केलं आहे. विशेष म्हणजे लवकरच ती आता एका नव्या चित्रपटामध्ये झळकणार आहे.
‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आता अशी दिसते
‘बजरंगी भाईजान’मधून नावारुपाला आलेली हर्षाली आता ११ वर्षांची झाली आहे.
Web Title: Then vs now see these photos of bajrangi bhaijaan actress harshaali malhotra aka munni ssv