
टिव्हीवरचा ‘कृष्ण’ म्हटलं की अजुनही सगळ्यांच्या डोळ्यासमोर येणारा गोंडस मराठी चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी. १८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत जन्म झालेल्या स्वप्नीलचा आज वाढदिवस स्वप्नीलने वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ , ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ,‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘दुनियादारी’ यांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. व्यावसायिक आयुष्यात तो ज्याप्रमाणे रोमॅण्टिक भूमिका करतो त्याचप्रमाणे तो वैयक्तिक आयुष्यातही तितकाच रोमॅण्टिक आहे. त्याने २०११ साली दंतवैद्य लीना हिच्याशी लग्न केलं.
स्वप्नील जोशी : ‘कृष्ण’ ते ‘चॉकलेट बॉय’पर्यंतचा प्रवास
Web Title: Happy birthday swapnil joshi ssj