-

'रामायण' ही ८०च्या दशकातील सर्वात लोकप्रिय मालिका असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचे दिग्दर्शन आणि लेखन रामानंद सागर यांनी केले होते. या मालिकेतील 'सीते'ची भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलीया हिने साकारली होती. आत्ता हिच दीपिका कशी दिसत असेल? असा प्रश्न चाहत्यांना अनेक वेळा पडला असेल. चला पाहूया दीपिका आत्ता कशी दिसते…
-
दीपिकाने 'रामायण' या मालिकेतून सर्वांच्या मनात घर केले होते. त्यावेळी दीपिकाचे वय केवळ २२ वर्षे होते. या मालिकेने दीपिकाच्या करिअरला एक वेगळे वळण दिले होते.
-
सध्या ५४ वर्षीय दीपिका अभिनयाच्या दुनियेपासून लांब आहे. तिने मनोज जोशी यांच्या 'नटसम्राट' या नाटकामध्ये शेवटचे काम केले आहे.
-
सध्या दीपिका सोशल मीडियावरदेखील सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
दीपिका तिचा पती आणि मुलींसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरुन एकंदरीत ती सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करत असल्याचे म्हटले जात आहे.
रामायणातील ‘सीता’ आता कशी दिसते? तुम्हीच पाहा…
रामायण या मालिकेत सीतेची भूमिका दीपिका चिखलीयाने साकारली होती
Web Title: Ramayan serial seeta role done by deepika chikhalia recent photo avb