
अभिनेत्री मलायका अरोरा तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. चाळीशीनंतरही मलायकाचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'दिल से' या चित्रपटातील 'छैय्या छैय्या' या गाण्यामुळे मलायका प्रकाशझोतात आली. फिटनेसच्या बाबतीत मलायका नेहमीच अव्वल अभिनेत्री ठरली आहे. -
कोणताही कार्यक्रम असो किंवा पार्टी असो मलायका तिचे जिम रुटीन कधीच चुकवत नाही.
अनेक बॉलिवूड अभिनेत्री फिटनेसच्या बाबती मलायकाला फॉलो करताना दिसतात. जिमसोबतच मलायका योगा देखील करते. २०१७ मध्ये अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका व अर्जुन कपूर यांचं रिलेशनशिप चर्चेत आलं. काही दिवसांपूर्वीच दोघांनी प्रसारमाध्यमांसमोर प्रेमाची कबुली दिली. अरबाजशी घटस्फोटानंतर अरहान मलायकासोबतच राहतो. -
मलायकाला १६ वर्षांचा मुलगा आहे. अरहान असं त्याचं नाव आहे.
-
सध्या मलायका-अर्जुनच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत.
-
सोशल मीडियावरही हे दोघं खुलेपणाने प्रेम व्यक्त करताना दिसतात.
Hot & Beautiful…चाळीशीनंतरही घायाळ करणारी मलायका
अभिनेत्री मलायका अरोरा तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. चाळीशीनंतरही मलायकाचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींनाही लाजवणारं आहे.
Web Title: Malaika arora birthday special her hot and beautiful photos ssv