-

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली २’ चित्रपटातून अनेकांच्या मनाचा ठाव घेतलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा आज वाढदिवस. 'बाहुबली २'मधील तिची देवसेना ही भूमिका प्रचंड गाजली होती. तिच्या या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या मनाचा राज्य केले होते.
-
तुम्हाला माहितीये का? अनुष्का शेट्टीचं खरं नाव अनुष्का नाहीये. अनुष्का हे तिने सिनेमासाठी ठेवलेलं नाव आहे. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. सिनेमात आल्यावर तिने आपलं स्वीटी हे नाव बदलून अनुष्का असं केलं.
-
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का योग प्रशिक्षक होती.
-
अनुष्का शेट्टी हे दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीमधील एक मोठं नाव आहे. ती तिकडची टॉपची अभिनेत्री आहे. इतकेच नव्हे तर अनुष्का दक्षिणेकडे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमधील एक आहे.
-
अनुष्का शेट्टी
-
गेल्या एका दशकापासून आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अनुष्काने टॉलीवूडमध्ये २००५ मध्ये पदार्पण केलं होतं.
HBD Anushka Shetty : बाहुबलीतील ‘देवसेने’विषयी या गोष्टी ठाऊक आहेत का?
आज अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा वाढदिवस आहे
Web Title: Happy birthday anushka shetty did you know interesting facts about the baahubali fame actress sdn