
राजकुमार हिरानी दिग्दर्शित '३ इडियट्स' या चित्रपटामध्ये आमिर खान, शर्मन जोशी, आर. माधवन या तीन अभिनेत्यांव्यतिरिक्त इतरही बरेच कलाकार झळकले होते. कलाकारांची गर्दी असूनही एका छोट्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती भूमिका ठरली ती म्हणजे ‘मिलीमीटरची’. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थांचे कपडे धुवायला देण्यापासून, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये उत्साहात सहभागी होणारा, महाविद्यालयाच्या संचालकांना चांगलच ओळखणारा हा ‘मिलीमीटर’. अभिनेता राहुल कुमारने ही खोडकर पण, तितकीच लक्षवेधी भूमिका साकारली होती. २००९ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ‘मिलीमीटर’ याच नावाने राहुल ओळखला जाऊ लागला. -
‘३ इडियट्स’ नंतर मात्र राहुल फारसा प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. पण, सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं.
-
राहुल मुळचा उत्तराखंडचा असून, त्याने बालकलाकार म्हणूनच या चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
-
‘ओमकारा’, ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’ या चित्रपटांतून तो झळकला होता.
-
पण, ‘३ इडियट्स’ हा चित्रपट त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी देऊन गेला.
‘३ इडियट्स’मधला मिलिमीटर आता असा दिसतो..
‘३ इडियट्स’ नंतर मात्र राहुल फारसा प्रसारमाध्यमांसमोर आला नाही. पण, सोशल मीडियावर मात्र तो चांगलाच सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं.
Web Title: Millimetre from 3 idiots looks nothing like centimetre watch photos ssv