सिल्क स्मिता हे नाव जरी घेतले तरी तिची मादक अदा डोळ्यांसमोर येते. पण स्मिताचा 'सिल्क स्मिता' बनण्याचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. बोल्डनेस आणि बिंदास हे शब्द स्मितासाठीच बनवले गेले असावेत असे तेव्हाच्या प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना वाटायचे. जीवनात एका वळणावर एकटी पडलेल्या या अभिनेत्रीने म्हणे आत्महत्या केली होती. आज सिल्क स्मिताचा वाढदिवस. स्मिताला १९७८ मध्ये कन्नड सिनेमा ‘बेदी’मध्ये पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आलेल्या ‘वांडीचक्रम’ (१९७९) या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिला सिल्क स्मिता हे नाव मिळालं. १० वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिने जवळपास ५०० हून अधिक सिनेमात काम केले.
सिल्क स्मिताचे कधीही न पाहिलेले फोटो
सिल्क स्मिता हे नाव जरी घेतले तरी तिची मादक अदा डोळ्यांसमोर येते
Web Title: 2nd january memorising silk smitha on her birthday smitha unseen photos ssj