Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. raj kapoor birthday spacial actor director bollywood jud

द शो मॅन

December 14, 2019 10:06 IST
Follow Us
  • हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की अभिनेता राज कपूर यांच्या नावाचा उल्लेख झाल्यावाचून राहात नाही. विविध धाटणीच्या चित्रपटांना हात घालत विविध पात्रांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा एक अभिनेता म्हणजे राज कपूर.
    1/32

    हिंदी चित्रपटसृष्टी म्हटलं की अभिनेता राज कपूर यांच्या नावाचा उल्लेख झाल्यावाचून राहात नाही. विविध धाटणीच्या चित्रपटांना हात घालत विविध पात्रांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारा एक अभिनेता म्हणजे राज कपूर.

  • 2/32

    १४ डिसेंबर १९२४ रोजी पेशावर येथे राज कपूर यांचा जन्म झाला होता. आज या लोकप्रिय अभिनेत्याच्या वाढदिवशी सर्वत्र त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.

  • 3/32

    हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा आलेख पाहता राज कपूर यांना 'शो मॅन' म्हणूनही ओळखले जायचे.

  • 4/32

    त्‍यांच्‍या निळ्‍या डोळ्‍यात कायम स्‍वप्‍नं तरळत असायची. कपाळावर आलेले बेफिकीर केस, तोंडात सिगारेट आणि डोळ्‍यात जादूभरली निळाई घेऊन ते त्‍यांच्‍या स्‍टुडिओत तासन्‌तास काम करायचे.

  • 5/32

    फक्त भारतातच नव्हे तर विविध देशांमध्ये आणि विशेषत: रशियामध्ये राज कपूर यांच्या चाहत्यांची संख्या आजही पाहण्याजोगी आहे.

  • 6/32

    वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षापासूनच राज कपूर यांची ओळख या चित्रपटांच्या माध्यमांसोबत झाली. तसे पाहायला गेले तर चित्रपट आणि अभिनयाचा वारसा आणि कपूर घराणे यांचे खूप आधीपासून चालत आलेले समीकरण आहे.

  • 7/32

    सहाय्यक आणि क्लॅपर बॉय म्हणून काम केलेल्या याच राज कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.

  • 8/32

    एक अभिनेता म्हणूनच नाही तर निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप उमटवली होती. चार्ली चॅपलिनपासून प्रेरित होत राज कपूर यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे एका नव्या अंदाजात प्रेक्षकांची मने जिंकली होती.

  • 9/32

    इतक्या वर्षांच्या यशस्वी चित्रपट कारकीर्दीमध्ये राज कपूर यांनी विविध अभिनेत्रींसोबत रुपेरी पडदा गाजवला. पण नर्गिस यांच्यासोबत त्यांनी केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली हेही तितकेच खरे.

  • 10/32

    राज कपूर आणि नर्गिस यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री आणि या दोघांचा अभिनय पाहता आर. के बॅनरची लिडिंग लेडी म्हणूनही नर्गिस ओळखल्या जाऊ लागल्या.

  • 11/32

    नर्गिसव्यतिरिक्त नुतन, वैजयंतीमाला यांसारख्या त्या काळच्या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतही राज कपूर यांनी काम केले.

  • 12/32

    'श्री ४२०', 'छलिया', 'अनाडी', 'संगम', 'जिस देश मे गंगा बेहती हे', 'मोरा नाम जोकर', 'बुट पॉलिश', 'आवारा' आणि अशा विविध चित्रपटांचा नजराणाच राज कपूर यांनी प्रेक्षकांसाठी सादर केला होता.

  • 13/32

    'बरसात', 'आवारा', 'श्री ४२०', 'संगम', 'मेरा नाम जोकर', 'बॉबी', 'सत्यम शिवम सुंदरम', 'प्रेमरोग', 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

  • 14/32

    'मेरा नाम जोकर' या महत्त्वाकांक्षी चित्रपटाला साकारण्यासाठी सहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला होता.

  • 15/32

    राज कपूर हे २४ वर्षांचे होते, जेव्हा त्यांनी आर.के फिल्म्स स्टुडिओची स्थापना केली. राज कपूर यांच्या चित्रपटातील भूमिका जितक्या प्रेक्शकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या होत्या तितकीच त्यांच्या चित्रपटातील गाणीही गाजली.

  • 16/32

    शंकर-जयकिशन या प्रसिद्ध संगीतकार जोडीने राज कपूर यांच्या बहुतांश चित्रपटांना संगीत दिले होते. शंकर जयकिशन यांचे संगीत, गायक मुकेश यांचा आवाज आणि पडद्यावर राज कपूर हे जणू अलिखित समीकरणच बनले होते.

  • 17/32

    राज कपूर पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

  • 18/32

    भारताचे माजी पंतप्रधान कै. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह राज कपूर, वैजयंतीमाला आणि राजेंद्र कुमार.

  • 19/32

    राज कपूर यांनी १९४८ ते १९८८ या त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यातील बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले.

  • 20/32

    राज कपूर त्यांच्या पत्नी कृष्णा आणि मुलगा रणधीर कपूर.

  • 21/32

    राज कपूर यांचे दुर्मिळ छायाचित्र.

  • 22/32

    दिलीप कुमार आणि राज कपूर त्यांच्या आई रामसर्णी कपूर यांच्यासह

  • 23/32

    अभिनेत्री वहिदा रहेमान आणि राज कपूर

  • 24/32

    राजेश खन्ना आणि राज कपूर

  • 25/32

    पृथ्वीराज आणि रामसर्णी कपूर यांच्या फोटोशेजारी बसलेले शम्मी कपूर, राज कपूर आणि जोगिंदर

  • 26/32

    जवानांच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज कपूर

  • 27/32

    'शारदा' चित्रपटातील दृश्य.

  • 28/32

    'सपनो का सौदागर'मधील हेमा मालिनी आणि राज कपूर

  • 29/32

    'संगम'च्या सेटवर राज कपूर आणि राजेंद्र कुमार.

  • 30/32

    बेबी नाझ आणि राज कपूर

  • 31/32

    परवरिश चित्रपटातील दृश्य.

  • 32/32

    आर के स्टुडिओमध्ये शेहनाई आणि स्कॉटिश पाइपच्या संगीतावर नाचताना राज कपूर.

Web Title: Raj kapoor birthday spacial actor director bollywood jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.