'तान्हाजी' या चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा अभिनेता कैलास वाघमारे विशेष भाव खाऊन जातो. कलाकारांच्या गर्दीतही तो लक्षात राहतो. कैलास वाघमारेची पत्नी मीनाक्षी राठोड हीसुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत तिने पंचबाईंची भूमिका साकारली आहे. नागराज मंजुळे यांच्या 'नाळ' या चित्रपटातदेखील ती झळकली होती. मीनाक्षीने कैलाससोबत अनेक नाटकांतून एकत्रित काम केले आहे. मीनाक्षी आणि कैलास हे दोघंही मूळचे जालन्याचे आहेत. त्यांनी मुंबईत येऊन अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये सहभाग घेतला. इथूनच त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली. कैलासचा एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म झाला. मुंबईत येऊन त्याने नाट्यकर्मी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. -
छायाचित्र सौजन्य- फेसबुक/मीनाक्षी राठोड
-
छायाचित्र सौजन्य- फेसबुक/मीनाक्षी राठोड
‘तान्हाजी’: चुलत्याची भूमिका साकारणाऱ्या कैलासची पत्नी आहे लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री
जाणून घ्या, कैलास आणि त्याच्या पत्नीबद्दल काही खास गोष्टी…
Web Title: Tanhaji the unsung warrior chulatya aka kailash waghmare wife is actress ssv