• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood celebrities proposed to their beloved ssj

valentine week 2020 : ‘या’ अभिनेत्यांनी आपल्या व्हॅलेंटाइनला केलं असं प्रपोज

आयुषमानने ताहिराला केलेलं प्रपोज कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा निराळं नाही

February 8, 2020 10:40 IST
Follow Us
    • व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा खास दिवस असतो. कधीकधी या प्रयत्नात अपयशाला सामोरं जावं लागतं तर कधी पहिल्याच प्रयत्नात होकार मिळतो. त्यामुळे प्रयत्न चुकला तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा दिवस खास करण्यासाठी तरुणाई हटके प्लॅन तयार करत असते. तसंच बॉलिवूडमध्येही असे काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तींना हटके पद्धतीने प्रपोज केलं. चला तर पाहुयात कोण आहेत हे कलाकार.
    • अभिषेक बच्चन- ऐश्वर्या राय- बॉलिवूडमध्ये कायम चर्चेत असणाऱ्या या जोडीची लव्हस्टोरी थोडी हटकेच आहे. गुरु चित्रपटाच्या सेटवर या दोघंचं सूत जुळलं. मात्र अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज करण्यासाठी खास जागा निवडली. त्याने न्युयॉर्कमध्ये ऐश्वर्याला प्रपोज केलं. गुरु चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे दोघं न्युयॉर्कला गेले होते. यावेळी ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. त्याच हॉटेलच्या बाल्कनीमध्ये अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं.
    • हृतिक रोशन- सुजेन खान – सुजेन खान आणि हृतिक रोशन यांचा आज घटस्फोट झाला असला तरी ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोघांनी २००० मध्ये लग्न केलं होतं. परंतु १७ वर्षांचा संसार केल्यानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांची लव्हस्टोरी अत्यंत दुंसर होती. हृतिकने पहिल्यांदा सुजेनला ट्रॅफिक सिग्नलमध्ये पाहिलं होतं. या पहिल्या नजरेतच तो तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो एकदा तिला भेटला. यावेळी त्याने कॉफीच्या मगमध्ये अंगठी टाकून तिला प्रपोज केलं.
    • असिन- राहुल – गजनी चित्रपटामुळे लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री असिन हिला प्रियकर राहुलने अत्यंत सुंदर पद्धतीने प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या प्रपोज करण्याची स्टाइल चांगलीच चर्चेत आली होती. राहुलने असिनला तब्बल ६ कोटी रुपयांची अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. ही अंगठी २० कॅरेटची बेल्जिअम डायमंडची होती. इतकंच नाही तर या अंगठीवर असिन आणि राहुल यांच्या नावातील पहिली दोन 'एआर' ही अक्षरं होती. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
    • सुनील शेट्टी- माना- सुनील शेट्टी आणि माना यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात एका पेस्ट्री शॉपमध्ये झाली. परंतु एकमेकांशी ओळख नसल्यामुळे मानाशी बोलायचं कसं हा प्रश्न सुनीलला पडला होता. यावर उपाय म्हणून त्याने मानाच्या बहिणीशी मैत्री केली. त्यानंतर या बहिणीच्या माध्यमातून सुनील आणि मानाची भेट झाली. त्यानंतर सुनीलने मानाला प्रपोज केलं. ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये लग्न केलं.
    • शाहरुख खान- गौरी खान – गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने किती मेहनत घेतली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. गौरीच्या वडिलांना लग्नासाठी राजी करण्यापासून ते समाजाशी लढण्यापर्यंत सारं काही शाहरुखने गौरीसाठी केलं. दिल्लीतील एका पार्टीमध्ये गौरी आणि शाहरुखची पहिली भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यातील मैत्री वाढली. त्यानंतर एक दिवस शाहरुखने मुंबईतील समुद्र किनारी गौरीला प्रपोज केलं. विशेष म्हणजे गौरीनेही लगेच होकार दिला. १९९१ मध्ये या दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं.
    • आयुषमान खुराना- ताहिरा कश्यप – आयुषमानने ताहिराला केलेलं प्रपोज कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा निराळं नाही. ताहिरा पंजाब विद्यापीठात मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेत असताना आयुषमानने तिला प्रपोज केलं. विशेष म्हणजे प्रपोज करत असताना त्याने संपूर्ण माहोल रोमॅण्टीक केला होता. लाल गुलाबांच्या फुलांची सजावट, बॅकग्राऊंडला म्युझिक, वाइनची बाटली आणि कॅण्डल लाईट डिनर करत आयुषमानने ताहिराला प्रपोज केलं.
    • फरदीन खान- नताशा माधवानी- लोकप्रिय अभिनेता फिरोज खान यांचा लेक फरदीन खान याने नताशा माधवानीसोबत लग्नगाठ बांधली आहे. फरदीनने नताशाला चक्क विमानात प्रपोज केलं. हे दोघंही एकाच विमानातून लंडन ते अमेरिका असा प्रवास करत होते. याच प्रवासादरम्यान फरदीनने नताशाला प्रपोज केलं.
    • रणवीर सिंग- दीपिका पदुकोण – बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्हस्टोरी साऱ्यांनाच ठावूक आहे. रणवीरचं दीपिकावर अफाट प्रेम आहे. त्यामुळे तो बऱ्याच वेळा तिची काळजी घेताना दिसून येतो. फराह खानने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये रणवीरने दीपिकाला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलं होतं.
    • बॉबी देओल- तान्या – बॉबी देओलची लव्हस्टोरी फार मोजक्या जणांना माहित आहे. बॉबीने पहिल्यांदा मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये तान्याला पाहिलं होतं. एका नजरेमध्येच तान्याच्या प्रेमात पडलेला बॉबी सतत तान्याचा संपर्का राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे तो सतत तिला फोन करायचा. असंच एकदा त्याने तान्याला भेटायला बोलावलं आणि तिला प्रपोज केलं. त्यानंतर १९९६ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Web Title: Bollywood celebrities proposed to their beloved ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.