• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. oscar 2020 marathi film directors indian movies mppg

Oscar 2020 : भारतीय चित्रपटांना ऑस्करपर्यंत नेणारे ‘मराठी’ दिग्दर्शक

February 9, 2020 22:37 IST
Follow Us
  • ऑस्करच्या स्पर्धेत आजवर अनेक भारतीय चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. काहींनी स्वत:हून नामांकन मिळवली तर काहींनी देशातर्फे प्रतिनिधित्व केलं. यातील बहुतांश चित्रपटांची निर्मिती मराठी दिग्दर्शकांनी केली होती. या फोटो गॅलरीत ऑस्करवारी करणारे मराठी दिग्दर्शक पाहूया.
    1/15

    ऑस्करच्या स्पर्धेत आजवर अनेक भारतीय चित्रपटांनी आपला ठसा उमटवला आहे. काहींनी स्वत:हून नामांकन मिळवली तर काहींनी देशातर्फे प्रतिनिधित्व केलं. यातील बहुतांश चित्रपटांची निर्मिती मराठी दिग्दर्शकांनी केली होती. या फोटो गॅलरीत ऑस्करवारी करणारे मराठी दिग्दर्शक पाहूया.

  • 2/15

    अशुतोष गोवारीकर (लगान) – २००१ साली अशुतोष गोवारीकर यानं ‘लगान’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट ऑस्कर स्पर्धेतील अंतीम पाच सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत पोहोचला होता.

  • 3/15

    बराच मोठा आणि गाण्यांनी नटलेला चित्रपट ऑस्करपर्यंत मजल मारेल अशी अपेक्षा कोणालाच नव्हती. परंतु अशुतोष गोवारीकरच्या जबरदस्त दिग्दर्शनाच्या जोरावर हे शक्य झालं.

  • 4/15

    संदिप सावंत (श्वास) – हिंदीत ‘लगान’नं इतिहास रचला. आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती मराठीत केली ती ‘श्वास’ या चित्रपटानं. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदिप सावंत यानं केलं होतं.

  • 5/15

    ज्या काळात मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर जाऊ लागला होता. त्याच काळात 'श्वास'ने ऑस्कर नामांकन मिळवून मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर स्पर्धेतीसाठी पाठवण्यात आला होता.

  • 6/15

    अमोल पालेकर (पहेली) – २००५ साली प्रदर्शित झालेला 'पहेली' हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडला गेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल पालेकर यांनी केलं होतं.

  • 7/15

    या चित्रपटाला नामांकन मिळालं नाही मात्र एका मराठी दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट ऑस्करसाठी जाणं हे नक्कीच मराठी प्रेक्षकांसाठी कौतुकाची बाब आहे.

  • 8/15

    परेश मोकाशी (हरिश्चंद्राची फॅक्टरी) – परेश मोकाशी या दिग्दर्शकानं हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटातून पदार्पण केलं आणि थेट ऑस्करवारी केली.

  • 9/15

    या चित्रपटात अगदी गंमतीशीर अंदाजात इतिहासातील पहिल्या चित्रपट निर्मितीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

  • 10/15

    चैतन्य ताम्हाणे (कोर्ट) – राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या ‘कोर्ट’ या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी झाली होती. हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.

  • 11/15

    ‘कोर्ट’चे दिग्दर्शन चैतन्य ताम्हाणे याने केले होते. हा चित्रपट अत्यंत लो बजेट जरी असला तरी दर्जेदार संहिता आणि अफलातून अभिनयाच्या जोरावर याने ऑस्करवारी केली होती.

  • 12/15

    अमित मोसुरकर (न्यूटन) – २०१७ साली अमित मोसुरकर या दिग्दर्शकानं ‘न्यूटन’ हा हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता.

  • 13/15

    ‘न्यूटन’मध्ये अभिनेता राजकुमार राव याने मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

  • 14/15

    या सर्व दिग्दर्शकांमध्ये संदिप सावंत, परेश मोकाशी आणि चैतन्य ताम्हाणे या तिघांनाही आपल्या पहिल्याच चित्रटात ऑस्करवारी गाठली.

  • 15/15

    या मराठी दिग्दर्शकांनी निर्माण केलेल्या या कलाकृती ऑस्करमध्ये जरी अपयशी ठरल्या तरी भारतीय चित्रपट इतिहासात त्या अजरामर झाल्या आहेत.

Web Title: Oscar 2020 marathi film directors indian movies mppg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.